Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र  / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 7 ग    अ.क्र.    प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता     1    स्वसंपादीत मालकी वहिवाटीच्या मिळकती         2    लग्नानंतर पक्षांच्या मालकीच्या मालमत्ता         3    कोणत्याही वडिलोपार्जित मालकीच्या मिळकतीमध्ये वाटा         4    पक्षाची इतर संयुक्त मालमत्ता (खाती/गुंतवणूक/एफडीआर/ म्युचअल फंड/स्टॉक डिबेंचर्स) त्याचे मुल्य व सद्यस्थिती         5    अचल संपत्तीचा ताबा आणि भाडे त्याबाबतचा तपशिल         6    प्रतिज्ञापत्र सादर करणाराने घेतलेले दिलेल्या कर्जाचे तपशिल         7    विवाहाचेवेळी व तदनंतर घेतलेल्या पक्षांचे दागदागीने व त्याचे वर्णन          8    अर्जदाराच्या मालकीच्या मालमत्तांचा विवाहासाठी केलेल्या बदलांची कृती किंवा व्यवहाराचा तपशिल अशी विक्री किंवा व्यवहाराची थोडक्यात का

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 6 फ    अ.नु.    प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल     1    नियोक्त्याचे नाव         2    कोणत्या पदावर/पदनाव         3    मासिक उत्पन्न         4    जर शासकीय नोकरदार असेल तर नवीनतम/चालु पगार प्रमाणपत्र किंवा सध्याचे वेतन स्लिप किंवा बँक खात्यात जमा होत असलेल्याचा पुरावा सादर करा.         5    जर नोकरदार खाजगी क्षेत्रात असेल तर अशा नियोक्ताची पदवी/कोणत्या पदावर नेमणुक आणि अशा व्यक्तीचे एकुण मासीक उत्पन्न दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करा आणि सध्याच्या सबंधीत कालावधीसाठी फॉर्म नं.16 सादर करा         6    सध्याच्या रोजगाराच्या वेळी नियोक्त्यांकडुन काही परवाणग्या, लाभ घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, महागाई भत्ता किंवा इतर कोणत्याही सेवा लाभ प्रदान केल्या जात असतील तर त्याचा तपशिल         7    उत्पन्न कर आकारल

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 5 इ    अ.क्र. पक्षांच्या मुलांचा तपशिल 1 विद्यमान विवाह/वैवाहीक संबंध मागील विवाहातील मुलांची संख्या    2 मुलांचे नाव आणि वय    3 मुले ज्यांच्या ताब्यात आहेत त्या पालकांचा तपशिल    4 अ)मुलांचे अन्न, कपडे, वैद्यकीय खर्चाचा तपशिल     ब)शिक्षणावरील खर्च आणि सामान्य खर्चाचा क)मुलांचा अतिरीक्त शैक्षणिक, व्यवसायिक किंवा व्यवसायीक/ शैक्षणिक खर्चाचा तपशिल, विशिष्ठ प्रशिक्षण किंवा अवलंबुन मुलांचे विशिष्ठ कौशल्य प्रोग्रामचे खर्चाचा तपशिल    ड)मुलांचे शिक्षणाकरिता कोणतेही कर्ज, तारण, आकारलेले शुल्क किंवा हप्ता योजनेचे तपशिल (जर देय असेल किंवा दिलेले असेल) असल्यास त्याबाबतचा तपशिल    5 मुलांचे शिक्षणाकरिता कोणत्याही एका पक्षाकडुन काही एेश्चिक योगदान दिले जात आहे किंवा कसे, जर होय, तर त्याचा तपशिल द्या, कोणत्याही अतिरीक्त यो

Affidavit Of Assets and Liabilities

  कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 4 ड    अ.क्र. अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील 1 पक्ष असो किंवा मुल/मुले कोणतीही शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व किंवा गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. असल्यास वैद्यकिय तपशिल द्या. 2 अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्याला गंभीर अपंगत्व आहे किंवा असे. त्यासाठी सतत वैद्यकीय खर्चाची आवश्यकता आहे किंवा कसे. असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र आणि आणि अंदाजे वैद्यकिय खर्चाचा तपशिल द्या. 3 पक्ष असो किंवा मुल/मुली किंवा कोणताही अन्य सदस्य जीवघेणा रोगाने त्रस्त असेल, ज्यासाठी महाग आणि नियमित वैद्यकीय खर्च करावा लागत असेल, जर होय हॉस्पीटलायजेशन/वैद्यकीय खर्चाचा तपशिल.

Affidavit Of Assets and Liabilities

  कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 3 क    अ.क्र. अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल 1 आश्चित कुटूंबातील सदस्यांचा तपशिल काही असल्यास    अ)आश्चित व्यक्तींशी संबंध    ब)आश्चित व्यक्तीचे वय आणि लिंग    2 अवलंबुन असलेल्यांच्या उत्पन्नांचे कोणतेही स्त्रोत/त्यात व्याजासह मालमलत्तेचे उत्पन्न, उत्पन्नावर पेन्शन, कर देय आणि इतर संबंधीत तपशिल    3 अवलंबुन असलेल्या व्यक्तींचा खर्च

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 2 ब    अ.क्र. कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल 1 अर्जदार आणि बिगर अर्जदार यांच्यात देखभाल किंवा मुलाच्या पाठींब्यासंबंधी कोणत्याही चालु असलेल्या किंवा मागील कायदेशीर कारवाईचा तपशिल    2 कौटुंबीक हिंसाचार अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहीता, हिंदु विवाह कायदा, दत्तक आणि देखभाल कायदा अगर इ. मधुन उद्भवलेल्या कोणत्याही कार्यवाहीत कोणत्याही देखभालीबाबत आदेश करण्यात आला आहे काय? होय असल्यास कार्यवाहीत किती देखभालीचा खर्च दिला जाता असेल तर याची माहीती द्या. 3 वर कलम 2 मध्ये नमुद न्यायप्रकरणामध्ये झालेल्या आदेशाची प्रत द्या. 4 पुर्वी पारित झालेल्या देखभालीचे खर्चाबाबत आदेशाचे पालन केले आहे किंवा कसे, जर नसेल तर देखभालीची थकबाकी त्याचा तपशिल द्या. 5 देखभालीसाठी काही एेच्छिक योगदान दिले गेले आहे/भविष्यात केले ज

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र / Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 1 अ    अ.क्र. वैयक्तीक माहीती 1 नाव    2 वय/लिंग    3 पात्रता (शैक्षणीक आणि व्ययसायीक) 4 अर्जदार हा/ही वैवाहीक घरी/पालकांच्या घरी/स्वतंत्र निवास स्थानी रहात आहेत किंवा नाही कृपया वैवाहीक घर किंवा राहत्या जागेचा सदय रहिवाशी पत्ता आणि त्याचा तपशिल द्या. निवासस्थानाची मालकी जर कुटूंबातील इतर सदस्याच्या मालकीची असेल. 5 लग्नाची तारीख    6 विभक्त होण्याची तारीख    7 अर्जदाराचे सामान्य मासिक खर्च (भाडे, घरगुती खर्च, वैद्यकीय बिले, वाहतुक)

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 1 - वैयक्तीक माहीती भाग 2 - कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल भाग 3 - अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल भाग 4 - अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील भाग 5 - पक्षांच्या मुलांचा तपशिल भाग 6 - प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल भाग 7 - प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता भाग 8 - प्रतिज्ञापत्र सदर करणाऱ्याचे दायीत्वाचा तपशिल भाग 9 - स्वरोजगार व्यक्ती/व्यवसायीक/व्यवसायीक व्यक्ती/उदयोजक भाग 10 - विरुध्द बाजुचे प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने नमुद केलेले उत्पन्न, मालमत्ता आणि दायीत्वाचा तपशिल भाग 11 - जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा

घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया

   घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया अर्जदारानी घटस्फोटाची केस दाखल केली असेल त्यामध्ये अर्जदार महिला असेल तर तिला घटस्फोटाच्या अर्जा सोबत मेंटेनन्सचा अर्ज देखील दाखल करता येतो जाब देणाऱ्यांना घटस्फोटाच्या केस च्या अर्जाबाबत व मेंटेनन्स अर्जावर कैफियत व जबाब दाखल करावा लागतो मेंटेनन्स अर्ज हा कोर्ट पहिला चालवते प्रथम मेन्टेनन्सच्या अर्जावर ऑर्डर होऊन मेंटेनन्स चालू होतो त्यानंतर अर्जदाराच्या मूळ घटस्फोटाच्या अर्जावर पुढील प्रक्रिया चालू होते पुरुष अर्जदार यांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात केला असेल तर महिला जाबदेणार ही कोर्टात हजर होवुन जबाब दाखल करते त्यावेळी जबाबा सोबत मेन्टेनन्सचा अर्ज दाखल करु शकते. www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3)

   घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3) घटस्फोटाच्या केस मध्ये अर्जदार यांचा पुरावा बंद झाल्यानंतर जाब देणाऱ्यांचा पुरावा चालू होतो जाब देणार हे प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून अर्जदार यांच्या अर्जातील मजकुर व विधाने ही बरोबर नाहीत व अर्जदार यांची मागणी ही कोर्टाने मान्य करु नये यासाठी योग्य ते पुरावे कोर्टात देवुन जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कैफीयत मधील मजकुर व विधाने व मागणी कोर्टात मान्य होणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन जाबदेणार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात जाब देणाऱ्यांचा पुरावा पूर्ण झाल्यानंतर जाब देणार हे पुरावा बंदची पुरशिस दाखल करतात त्यानंतर अर्जदार यांचे वकील व जाबदेणाऱ्यांचे वकील हे युक्तिवाद करतात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट हे दोन्ही पक्षाचे पुराव्याची पाहणी-छाटणी करुन ऑर्डर करतात www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2) घटस्फोटाच्या केस मध्ये मुद्दे-ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो अर्जदार प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वतःच्या अर्जामधील मजकुर- विधाने सिध्द करण्यासाठी व मागणी कोर्टांनी मान्य करणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन अर्जदार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात सदर पुराव्यांना कोट हे निशाणी देते अर्जदार यांचा पुरावा संपल्यानंतर अर्जदार हा evidence closeकिंवा पुरावा बंदची पुरशिस अर्जदार हे दाखल करतात www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 1)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया ( भाग 1) घटस्फोट केस कोर्टात दाखल केल्यानंतर जाब देणाऱ्यांना बेलिफांच्या मार्फत नोटीस पाठवली जाते नोटीस ची बजावणी झाल्यानंतर जाब देणार हा कोर्टात वकिलांमार्फत हजर राहतो जाबदेणार कोर्टात हजर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जाब देणाऱ्याला कैफियत दाखल करावी लागते सदर कैफियत दाखल केल्यानंतर कोर्ट हे अर्जदाराचा अर्ज व जाबदेणार याचा जबाब यावर मुद्दे (ISSUE) काढतात ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो www.advocatesarika.com

वाटप पत्र रजिस्टर करणेकामी लागणारी कागदपत्र

वाटप पत्र रजिस्टर करणेकामी लागणारी कागदपत्र 1)सध्याचा ७/१२ उतारा 2)सध्याचा ८ अ उतारे 3)ज्या फेरफार द्वारे 7/12 उताऱ्यावर नोंद झाली आहे ते सर्व फेरफार 4)ज्या गट नंबर /सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्या गट नंबर/सर्व्हे नंबर चे झालेले सर्व खरेदीखत , साठे खत, हक्कसोडपत्र किंवा कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट याचे कागदपत्र 5)सर्च रिपोर्ट (शक्य असल्यास सन 1954 वर्षापासूनचा असावा) 6)ज्याच्यामध्ये वाटप होणार आहे त्या सर्व वारसदार (वापटपत्र करुन ठेवणार), तसेच मान्यता देणार यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, आयडीसाईज फोटो 7)वाटप करुन ठेवणार तसेच मान्यता देणार यांचे नाते वंशावळ 8)ज्याच्या मृत्यूनंतर पुढील वारसदार यांची नावे फेरफार द्वारे 7/12 उताऱ्याला लागलेली आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले 9)ज्या गटाचे किंवा सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्याच्या चतुःसिमा 10)ज्या गट नंबरचे वाटप करायचे आहे त्यावर जर पिक पाणी कर्ज असेल तर ज्याच्या नावे कर्ज आहे त्याचे सदर पिक पाणी कर्ज फेडण्याचे हमी पत्र

वाटप पत्र करुन मिळणेसाठी/वाटप होणेसाठी कोर्टात

शेत जमीन मिळकतीचे वाटप पत्र करुन मिळणेसाठी/वाटप होणेसाठी कोर्टात दावा दाखल करणेसाठी लागणारी कागदपत्रे 1)सध्याचा ७/१२ उतारा 2)सध्याचा ८ अ उतारे 3)ज्या फेरफार द्वारे 7/12 उताऱ्यावर नोंद झाली आहे ते सर्व फेरफार 4)ज्या गट नंबर /सर्व्हे नंबरचे वाटप करुन मागायचे आहे त्या गट नंबर/सर्व्हे नंबर चे झालेले सर्व खरेदीखत , साठे खत, हक्कसोडपत्र किंवा कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट याचे कागदपत्र 5)सर्च रिपोर्ट (शक्य असल्यास सन 1954 वर्षापासूनचा असावा) 6)ज्या गट नंबर/सर्व्हे नंबरचे वाटप करून मागणाऱ्याचे म्हणजे वादी यांचे आधार कार्ड 7)वादी व प्रतिवादी यांचे नाते वंशावळ 8)ज्याच्या मृत्यूनंतर पुढील वारसदार (वादी -प्रतिवादी) यांची नावे फेरफार द्वारे 7/12 उताऱ्याला लागलेली आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले 9)ज्या गटाचे किंवा सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्याच्या चतुःसिमा 10)वाटप करुन मिळणेकामी प्रतिवादी यांना वादी यांनी वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस 11)वाटप करुन मिळणेसाठी पाठवलेल्या वादी यांच्या लिगल नोटीसीस प्रतिवादी यांनी त्यांच्या वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस 12)सदर जमिन मिळकतीबाबत भरलेल्या कर पावत्या.

पोटगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 पोटगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 1)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याचे पगार पत्रक 2)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे असणारे सर्व प्रॉपर्टी चे कागदपत्र उदाहरणार्थ शेतजमीन, घर मिळकत, ऑफिस, व्यवसायाच्या ठिकाणी असलेली मिळकत, व्यवसायिक गाड्या, भाड्याने दिलेली घरे इत्यादीची माहिती देणारी कागदपत्रे 3)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे कोणताही व्यवसाय असेल किंवा कोणत्याही व्यवसायापासून त्याला ठराविक रक्कम दरमहा मिळत असेल तर त्याचे सर्व कागदपत्रे 4)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याचा ऑनलाईन बिझनेस असेल तर त्या ऑनलाईन बिझनेसचे कागदपत्र ,ऑनलाइन लिंक, ऑनलाइन बिजनेस बाबतची माहिती 6)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याच्या नावे असणारी बँकेमध्ये किंवा सहकारी पतसंस्थेमध्ये असलेली फिक्स डिपॉझिट, सेविंग अकाउंट, इतर ठेवी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक याची कागदपत्रे

जन्माची नोंद व मृत्युची नोंद

 जेव्हा बाळाच्या जन्माची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मुलाच्या जन्माच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मुलाच्या आई-वडीलांचे आधार कार्ड 2)लाईटबील/लायसन्स 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मुलांचा जन्माची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)मुलाचा जग्न ज्या दवाखान्यात झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मुलाचा जन्म त्या दिवशी झाला आहे. उदा. शाळेचे आयडी कार्ड, रेशन कार्ड इत्यादी जेव्हा व्यक्तीच्या मृत्युची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मृत्युच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मयत व्यक्तीचे आधार कार्ड, जो खडला दाखल करणार आहे त्यांचे आधार कार्ड 2)मयत व्यक्तीची नोंद असलेले रेशन कार्ड 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मयत व्यक्तीच्या मृत्युची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)ज्या दवाखन्यात मयत व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मयत व्यक्ती चा त्या दिवशी  मृत्यु झाला आहे.

चेक देणाऱ्याने घ्यावयाची काळजी

 चेक देणाऱ्याने घ्यावयाची काळजी 1)चेक देताना चेक वरील सर्व माहिती तारखेसहित भरून देणे 2)चेक आपण कशासाठी देत आहोत याचा एक करारनामा करणे. 3)चेक हा सिक्युरिटी म्हणून दिला असल्यास व त्याबाबत लेखी स्वरूपात पुरावा असल्यास चेक बाउन्स केस मध्ये चेक देणार यास फायदा होतो 4)कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचा करारनामा करून ठेवावा हात उसने कर्ज घेतल्यानंतर काही काळानंतर जर कर्ज फेडले असेल तर सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक हा परत घेणे. 5)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर  देखील चेक परत देत नसेल तर चेक घेणारा व्यक्तीस वकिलाऺमार्फत लीगल नोटीस पाठवावी 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर  देखील चेक परत देत नसेल तर त्याच्या विरुद्ध किंवा चेक हरवल्याची/चेक गहाळ झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करणे 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर   देखील चेक परत देत नसेल तर सदर चेकचे ट्रांजेक्शन थांबवण्यासाठी बँकेस लिखित स्वरूपात किंवा मेल द्वारे कल्पना देणे

कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना

 कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही मे. कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. हे दस्तऐवज न्यायालयाला तुमच्या हेतूंबद्दल माहिती देणे, आवश्यक माहिती प्रदान करणे आणि घटस्फोटाची न्याय्य आणि कायदेशीर प्रक्रिया सुनिश्चित करणे यासह अनेक उद्देश पूर्ण करतात. येथे सामान्यत: आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सूची आणि त्यांची आवश्यकता का आहे याचे स्पष्टीकरण आहे: घटस्फोटासाठी याचिका समन्स आर्थिक प्रतिज्ञापत्र बाल कस्टडी मालमत्ता आणि कर्ज विवरण वैवाहिक समझोता करार (लागू असल्यास) सेवेचा पुरावा तात्पुरत्या ऑर्डरसाठी विनंती (आवश्यक असल्यास): सुनावणीची सूचना विवाह प्रमाणपत्र: फाइलिंग फी: यातील प्रत्येक दस्तऐवज घटस्फोट प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ते न्यायालयाला तुमच्या केसचे तपशील समजून घेण्यात, दोन्ही पक्षांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करण्यास आणि न्याय्य आणि कायदेशीर घटस्फोट सुनिश्चित करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, या दस्तऐवजांमध्ये अचूक आणि संपूर्ण माहिती प्रदान करणे हे घटस्फोटाचा यशस्वी परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक आहे.

कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी

 कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. येथे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे: कागदपत्रे- 1)दाखल करणाऱ्याचा आय डी साईज फोटो (आवश्यक) 2)दाखल करण्याऱ्याचे आधार कार्ड (आवश्यक) 3)लग्न पत्रिका / विवाह प्रमाणपत्र (कार्यालयाचे/रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट)(आवश्यक) 4)लग्नातील फोटो(आवश्यक) 5)कायम स्वरुपी रहात असलेल्या ठिकाणचे लाईट बील/भाडेपट्टा करार (जर असेल तर) 6)पोलीस तक्रार (जर असेल तर) 7)वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस (जर असेल तर) 8)लग्नामध्ये केलेल्या खर्चाच्या पावत्या (जर असतील तर) वरिल दिलेल्या कागदपत्रांमधील आवश्यक असलेली कागदपत्रे  उपलब्ध  नसतील /होणार नसतील तर त्याच्या पुष्टीसाठी स्वतंत्र अॅफिडेव्हीट कोर्टात द्यावे लागते.   By Adv. Sarika khude Rajgurunagar, Pune