घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2)
घटस्फोटाच्या केस मध्ये मुद्दे-ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो
अर्जदार प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वतःच्या अर्जामधील मजकुर- विधाने सिध्द करण्यासाठी व मागणी कोर्टांनी मान्य करणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन अर्जदार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात
सदर पुराव्यांना कोट हे निशाणी देते
अर्जदार यांचा पुरावा संपल्यानंतर अर्जदार हा evidence closeकिंवा पुरावा बंदची पुरशिस अर्जदार हे दाखल करतात
www.advocatesarika.com