जेव्हा बाळाच्या जन्माची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मुलाच्या जन्माच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मुलाच्या आई-वडीलांचे आधार कार्ड 2)लाईटबील/लायसन्स 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मुलांचा जन्माची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)मुलाचा जग्न ज्या दवाखान्यात झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मुलाचा जन्म त्या दिवशी झाला आहे. उदा. शाळेचे आयडी कार्ड, रेशन कार्ड इत्यादी जेव्हा व्यक्तीच्या मृत्युची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मृत्युच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मयत व्यक्तीचे आधार कार्ड, जो खडला दाखल करणार आहे त्यांचे आधार कार्ड 2)मयत व्यक्तीची नोंद असलेले रेशन कार्ड 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मयत व्यक्तीच्या मृत्युची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)ज्या दवाखन्यात मयत व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मयत व्यक्ती चा त्या दिवशी मृत्यु झाला आहे. ...
We Make Law Easy For Everyone