जेव्हा बाळाच्या जन्माची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मुलाच्या जन्माच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे
1)मुलाच्या आई-वडीलांचे आधार कार्ड
2)लाईटबील/लायसन्स
3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मुलांचा जन्माची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला
4)मुलाचा जग्न ज्या दवाखान्यात झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मुलाचा जन्म त्या दिवशी झाला आहे. उदा. शाळेचे आयडी कार्ड, रेशन कार्ड इत्यादी
जेव्हा व्यक्तीच्या मृत्युची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मृत्युच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे
1)मयत व्यक्तीचे आधार कार्ड, जो खडला दाखल करणार आहे त्यांचे आधार कार्ड
2)मयत व्यक्तीची नोंद असलेले रेशन कार्ड
3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मयत व्यक्तीच्या मृत्युची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला
4)ज्या दवाखन्यात मयत व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मयत व्यक्ती चा त्या दिवशी मृत्यु झाला आहे.
कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल -- अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील -- असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे -- परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घर...