वाडवडिलार्जित मिळकत व स्वअर्जित मिळकत What are the Differences between Succession and Survivorship? एकत्र कुटुंबापेक्षा कोपार्सनरी ही मर्यादित कुटुंबपद्धती आहे . यामध्ये फक्त जन्माने हक्क प्राप्त होतो . मुले , नातू आणि पणतू यांनाच एकत्र कुटुंबाची मिळकत धारण करणाऱ्या मिळकतीत वंशपरंपरागत हक्क प्राप्त होतो . तीन पिढ्या एकाच पूर्वजापासूनचे वंशज यांना उतरत्या क्रमाने असणाऱ्या माणसाला फक्त कोपार्सनर म्हणून वाडवडिलार्जित मिळकतीत हक्क प्राप्त होती . परंतु जर ती मिळकत स्वतंत्र , एकट्याची , वेगळी असेल तर त्या मिळकतीचा मालक तो एकटाच असतो व त्यावर इतर कुणाचा हक्क असत नाही ; मग ती मिळकत त्याला भाऊ , काका , आईकडून मिळालेली असो आणि त्या स्वतंत्र मिळकतीत मुलाला जन्मतः हक्क प्राप्त होत नाही आणि त्याच्या मुलाकडे ती इस्टेट उत्तरजीविता (Survivorship) म्हणून जात नाही तर ती उत्तराधिकाराने (Succession) जाते . उत्तरजीवितेमध्ये एकत्र कुटुंबाची मिळकत असते व त्यात हिंदूला जन्मतः हक्क असतो . तो हक्क काही वेळेला वाढतो व काही वेळेला कमीही होतो . परंतु उत्तराधिकारामुळे जे हक्कदार आहेत त्या सर्वांनाच हक्क प्राप्त...
We Make Law Easy For Everyone