Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

What are the Differences between Succession and Survivorship?

वाडवडिलार्जित मिळकत व स्वअर्जित मिळकत What are the Differences between Succession and Survivorship? एकत्र कुटुंबापेक्षा कोपार्सनरी ही मर्यादित कुटुंबपद्धती आहे . यामध्ये फक्त जन्माने हक्क प्राप्त होतो . मुले , नातू आणि पणतू यांनाच एकत्र कुटुंबाची मिळकत धारण करणाऱ्या मिळकतीत वंशपरंपरागत हक्क प्राप्त होतो . तीन पिढ्या एकाच पूर्वजापासूनचे वंशज यांना उतरत्या क्रमाने असणाऱ्या माणसाला फक्त कोपार्सनर म्हणून वाडवडिलार्जित मिळकतीत हक्क प्राप्त होती . परंतु जर ती मिळकत स्वतंत्र , एकट्याची , वेगळी असेल तर त्या मिळकतीचा मालक तो एकटाच असतो व त्यावर इतर कुणाचा हक्क असत नाही ; मग ती मिळकत त्याला भाऊ , काका , आईकडून मिळालेली असो आणि त्या स्वतंत्र मिळकतीत मुलाला जन्मतः हक्क प्राप्त होत नाही आणि त्याच्या मुलाकडे ती इस्टेट उत्तरजीविता (Survivorship) म्हणून जात नाही तर ती उत्तराधिकाराने (Succession) जाते . उत्तरजीवितेमध्ये एकत्र कुटुंबाची मिळकत असते व त्यात हिंदूला जन्मतः हक्क असतो . तो हक्क काही वेळेला वाढतो व काही वेळेला कमीही होतो . परंतु उत्तराधिकारामुळे जे हक्कदार आहेत त्या सर्वांनाच हक्क प्राप्त

6 Common Legal Grounds For Divorce Which Are

Causes of Divorce घटस्फोटाची कारणे Causes of Divorce I Reasons for Divorce I Most Common Reasons for Divorce काही लोक लग्नाला कमी महत्त्व देतात अशा व्यक्ती कौटुंबिक कार्ये उदा . लग्नाचा वाढदिवस , धार्मिक निषिद्ध उदा . पुजाअर्चा किंवा जीवनभर पालकांच्या वचनबद्धतेच्या भूमिकेबद्दल त्यांना जास्त आवड नसते . अनुभवी कायद्याचा गैरवापर , नातेवाईकांच्या चुकीचे गोष्टींना पाठिंबा देणे , पुनर्विवाह करण्याची संधीचा लाभ घेणे आणि सर्वसाधारणपणे आर्थिक , धार्मिक आणि मानसिक त्रास होऊ नये याकरता बेताल वागणुकीमुळे स्वातंत्र्य मिळण्याची दारे काही विशिष्ट जोडप्यांसाठी अधिक खुले होऊन घटस्फोट होण्याची कारणे उभ्दवण्याची शक्यता असल्याचा धोका निर्माण होतो .   काही मुख्य कारणे 1) आधुनिकीकरण कुटूंबाच्या विखुरण्याचे प्रमाण आधुनिककाळात वाढल्याने मत बदलून नैतिकत मुल्यांचा ऱ्हास होत असून जन्म नियंत्रण तंत्रांद्वारे अनैतिक लैंगिक संबंध व व्यभिचारी वागणुकीत जास्तच भर पडली आहे . तसेच ऐकत्र कुटुंब पध्दती आणि विवाह यांना धार्मिक महत्त्व कमी मिळत असल्याने कुटुंब विखुरली जात आहेत व विवाह संकल्पना क्षीण होत आहे . पूर्वी

HUF Property and Partition & Individual Business and Property

एकत्र कुटुंबाचा व्यवसाय , त्याची धारणा आणि शाबित HUF Property and Partition & Individual Business and Property हिंदू कायद्यात अशी धारणा नाही की व्यवसाय जो एका सभासदाने चालवला आहे , तो व्यवसाय हा एकत्र कुटुंबाचा व्यवसाय आहे . तसेच अशी धारणा नाही की , एका सहदायिकाने त्रयस्थामार्फत जो व्यवसाय चालवला आहे तो एकत्र कुटुंबाचा आहे . तसेच अशी धारणा नाही की , जरी मॅनेजर किंवा कर्ता यांनी व्यवसाय केला असला तर तो एकत्र कुटुंबाचा व्यवसाय आहे . परंतु जर एकत्र कुटुंबाचे उत्पन्न हे नविन शाखा उघडण्यासाठी वापरले असेल तर नवीन शाखा ही जुन्या धंद्याची शाखा आहे असे समजले जाते . एखादा व्यवसाय हा एकत्र कुटुंबाचा सतत चालू आहे किंवा व्यक्तीचा स्वतंत्र व्यवसाय आहे किंवा समाईकात व्यवसाय आहे . ह्या गोष्टी निरनिराळ्या वस्तुस्थिती आणि गोष्टीवर अवलंबून आहेत . कोणा एका एकत्र हिंदू कुटुंबाच्या सभासदाच्या नावावर व्यवसाय आहे तो एकत्र कुटुंबाचा व्यवसाय आहे जरी तो कर्ता असला तरी अशी धारणा नाही . पण एखाद्या सभासदाच्या हातात जर व्यवसाय असेल तर तो व्यवसाय एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून केला असेल तर

What Are the Effects of Divorce Every Part Of Family?

घटस्फोट आणि त्याचे परिणाम Divorce and its Effects Divorce and its Effects घटस्फोट आणि त्याचे परिणाम १ ) ताण ताण एक शारीरिक प्रतिक्रिया म्हणून परिभाषित केली जाऊ शकते जी अंतर्गत , संज्ञानात्मक उत्तेजना किंवा बाह्य वातावरणीय उत्तेजनांच्या प्रतिसादात उद्भवू शकते . शारीरिक कमकुवत प्रतिसाद , हृदय विकार आणि ब्लडप्रेशर , कोरडे तोंड , श्वासोच्छ्वासमधील वाढणारी गती आणि इतर आजार हे ताणतणावामुळे होतात . कामावरील दडपण , स्वतःमध्ये असणारे व्यक्ती दोष असे स्वत : च्या अंतर्गत प्रतिक्रिया किंवा आपल्या मित्राचे , नातेवाईकाचे आणि शेजार्‍यांपाजार्‍यांचे नकारात्मक टोमणे यामुळे देखिल ताणतणाव निर्माण होतो . विवाह , कौटुंबिक सदस्याचा मृत्यू आणि घटस्फोट यासारख्या महत्त्वपूर्ण घटना सामान्य जीवनात अडथळा आणतात आणि अधिक ताणतणाव निर्माण करतात . या घाईगडबडीच्या जीवनातील घटनेचा आरोग्यावर - शारिरीक व मानसिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होऊ शकतो . या आधुनिक व घाईगडबडी जीवनातील घटनांच्या रँकिंगसाठी विकसित केलेल्या प्रमाणात , त्यामध्ये घटस्फोट हा दुसर्‍या क्रमांकावर येत असून त्याला तीव्र ताणतणाव म्हणून रेटिंग दिले गेले आ