घटस्फोट आणि त्याचे परिणाम
Divorce and its Effects
![]() |
Divorce and its Effects घटस्फोट आणि त्याचे परिणाम |
ताण एक शारीरिक प्रतिक्रिया म्हणून परिभाषित केली जाऊ शकते जी अंतर्गत, संज्ञानात्मक उत्तेजना किंवा बाह्य वातावरणीय उत्तेजनांच्या प्रतिसादात उद्भवू शकते. शारीरिक कमकुवत प्रतिसाद, हृदय विकार आणि ब्लडप्रेशर, कोरडे तोंड, श्वासोच्छ्वासमधील वाढणारी गती आणि इतर आजार हे ताणतणावामुळे होतात. कामावरील दडपण, स्वतःमध्ये असणारे व्यक्ती दोष असे स्वत: च्या अंतर्गत प्रतिक्रिया किंवा आपल्या मित्राचे, नातेवाईकाचे आणि शेजार्यांपाजार्यांचे नकारात्मक टोमणे यामुळे देखिल ताणतणाव निर्माण होतो. विवाह, कौटुंबिक सदस्याचा मृत्यू आणि घटस्फोट यासारख्या महत्त्वपूर्ण घटना सामान्य जीवनात अडथळा आणतात आणि अधिक ताणतणाव निर्माण करतात. या घाईगडबडीच्या जीवनातील घटनेचा आरोग्यावर-शारिरीक व मानसिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या आधुनिक व घाईगडबडी जीवनातील घटनांच्या रँकिंगसाठी विकसित केलेल्या प्रमाणात, त्यामध्ये घटस्फोट हा दुसर्या क्रमांकावर येत असून त्याला तीव्र ताणतणाव म्हणून रेटिंग दिले गेले आहे.
तणावग्रस्त घटनांमुळे शरीरात अनेक लहान किंवा मोठे शारीरिक बदल होत असतात. तणावग्रस्त घटनांमुळे झालेले बदल समजून घेणे फार महत्वाचे आहे कारण ते आपल्या मधील रोग प्रतिकारक शक्ती क्षीण करतात. अनेक रोग ताणमुळे होतात ही वस्तुस्थिती डॉक्टरांनी स्वीकारली आहे. पती-पत्नीचा कायदेशीर होण्यापूर्वीच त्यांना अनेक कादेशीरबाबींची सामोरे जावे लागते, जे त्यांच्यासाठी वेदनादायक असतात. तसेच कादेशीरबाबींचा वेळोवेळी पाठपुरावाही करावा लागतो.
२) स्वाभिमानाची कमतरता आणि अपयशाची भावना
घटस्फोटामुळे जोडीदारावर कधीकधी नकारात्मक प्रभाव पडूण स्वःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो व अपयशाची भावना निर्माण होते. यामुळे त्यांचे दैनदीन जीवन व कामकाजावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
नकारात्मक भावनांमुळे लोकांचा मानसिक असंतुलन वाढू शकतो, ज्यामुळे स्वभावामध्ये तीव्र संताप किंवा आक्रमकता उद्भवू शकते.
घटस्फोटामुळे विभक्त झाल्याच्या कारणावरून तसेच मुलांच्या विरहामुळे जोडीदार व मुलांमध्ये शारिरीक व मानसिक ताणतणाव वाढू शकतो. ज्यामुळे कधीकधी नैराश्य येते आणि पश्चात्ताप होतो.
तुटलेल्या घरातून किंवा एकल-पालक कुटुंबातून आलेल्या मुलांमध्ये- तरुणांमध्ये अपराधी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ उद्भवते.
विवाह ही जिव्हाळा, उत्तेजन, स्वीकृती आणि विश्वासाचे वातावरणची स्थिरता प्रदान करते. घटस्फोटामुळे या सर्वांचा अर्थ गमावण्याबरोबरच जोडीदार तसेच मुलांवरही नकारात्मक प्रभाव पडतो. घटस्फोटीत जोडीदाराचे जवळचे नातेवाईकांवरही त्यांच्या नकारात्मक प्रभावाचा परिणाम दिसून येतो.
घटस्फोटाचे खालील व्यक्तीवर परिणाम होतात.
i) मुले
ii) जोडीदार
iii) कुटुंब -आई-वडील
भावनिक विवंचणेतून शारिरीक व मानसीकदृष्या विशिष्ट परिणाम होत असतात. अस्वस्थता, भूक न लागणे, शांतता, सामान्य औदासीन्य आणि ही शारीरिक लक्षणे आहेत
मनोविकृतीचा आजार हा घटस्फोटामुळे उद्भवू शकतो.
सामाजिक - मुलाच्या सामाजिक वर्तनावर परिणाम होतो. जोडप्यामध्ये झालेल्या घटस्फोटामुळे त्यांची मुले ही इतरांच्या प्रगतीबद्दल प्रतिसाद देण्याचे टाळतात तसेच दुसर्यांना सहकार्य न करणे आणि इतरांबद्दल वैमनस्य असा मुलांच्यावर परिणाम होतो.
भावनिक - घटस्फोटित पालकांच्या मुलांमध्ये भावनिक प्रतिसादाचा अभाव अढळून येतो. त्यांच्या मध्ये असुरक्षितीची भावना निर्माण होऊ शकते. तसेच असमाजिक वर्तन, अस्वस्थता, चिंता, स्वभाव आणि इतर अनेक प्रकारच्या विकृतींच्या सखोल संबंधित भावना विकसित करतात व अपराधी- गून्हेगारीचा मार्ग अवलंबतात.
Written by Adv. Sarika Khude
(Rajgurunagar, Pune)