Causes of Divorce
घटस्फोटाची कारणे
![]() |
Causes of Divorce I Reasons for Divorce I Most Common Reasons for Divorce |
कुटूंबाच्या विखुरण्याचे प्रमाण आधुनिककाळात वाढल्याने मत बदलून नैतिकत मुल्यांचा ऱ्हास होत असून जन्म नियंत्रण तंत्रांद्वारे अनैतिक लैंगिक संबंध व व्यभिचारी वागणुकीत जास्तच भर पडली आहे. तसेच ऐकत्र कुटुंब पध्दती आणि विवाह यांना धार्मिक महत्त्व कमी मिळत असल्याने कुटुंब विखुरली जात आहेत व विवाह संकल्पना क्षीण होत आहे.
पूर्वी विवाहाचा कार्यक्रम हा दोन कुटुंबामधील लागेबांधे व जिव्हाळ्याचे कार्य समजले जात होते. आधुनिकीकरणासह जोडप्यांची लग्न करण्याची संकल्पना बदलत असून ते स्वतःच्या पसंतीनुसार रुढी, कार्यपध्दती निर्माण करत आहेत व त्यामध्ये वाढ होत आहे. अशा प्रचलित रुढीच्या लग्नास जरी कुटुंबांनी समंती दिली असली तरी त्या दोन कुटुंबामध्ये त्यांचे दरम्यान नैसर्गिक बंध कुटुंबे नेहमीच होत नाहीत. लग्नासाठी स्वतःचा जोडीदार निवडण्याचे फायदे जसे आहेत तसेच वैवाहिक स्थिरतेसंदर्भात तोटेही आहेत.
भारतासारख्या देशातही अनेक ठिकाणी छुप्या परंपरा आहेत तेथे देखिल प्राथमिकता बदलली आहे पतीप्रमाणे स्त्री देखिल स्वतःचे करियर घडविण्यासाठी धडपड करत आहे. स्त्रीने केलेले अपरिहार्य मुक्ती, आर्थिक स्वातंत्र्य आणि अाधुनिकीकरणाचा प्रभावामुळे स्त्रीने विवाहाला नवीन दृष्टीकोन, विशेषतः सुशिक्षित शहरी रहिवासी लोकांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे.
आधुनिककाळातील लोक अधिक महत्वाकांक्षी आहेत. पारंपारिक समाजातील लोकांपेक्षा आधुनिक कुटुंब जीवन पध्दतीचा स्विकार केलेला असून ते स्वतःच्या करिअरला जास्त महत्त्व देत असतात. अशा प्रकारे, कुटुंबकडे दुर्लक्ष होत असून कुटुंब जीवन शैलीही लयास जात आहे. कुटुंबाच्या नैतिकमुल्याच्या व्यक्तीत्व (स्वतःचा आनंद- स्वातंत्र्य) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
शहरीकरण, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून विभक्त कुटुंब अस्तित्वात आले. भारतीय दृष्टीकोनातून, कौटुंबिक संकल्पना ही एकत्र कुटुंब प्रणालीच्या दृष्टीने पाहीली जात होती. एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये मुलांकडे योग्यरित्या लक्ष दिले जात होते. पालकाकडे नेहमी आदराने पाहिले जात होते व त्याचा आदरही राखला जात होता. लहान थोर मंडळी ही मोठ्याकडे मार्गदशन घेत होते. एकत्र कुटुंबांध्ये एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर, अत्यावश्यक गोष्टीबाबत, अडचणीवर मात करण्यासाठी सर्व सदस्याशी सल्लामसलत करुन विचार विनिमय करुन तोडगा काढला जात होता. एकत्र कुटुंबामध्ये वाडवडिलांकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. एकत्र कुटुंबामध्ये एकालाच महत्त्व दिले जात नव्हते तसेच घटस्फोटासंदर्भात कोणीही घाईगडबडीत निर्णय घेतले जात नव्हते किंवा वैयक्तीक निर्णय घेतला जात नव्हता.
नोकरीच्या संधिसाठी लोक हे आपले गाव सोडून मोठ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचे स्विकारत आहेत. मोठ्या शहरांमध्ये घरांच्या सुविधा ही एक मोठी समस्या असून लोक त्यांच्या कुटुंबासमवेत एकत्र राहू शकत नाहीत. इच्छापुर्तीसाठी लोक हे व्यभिचारी वागणुकीचा अवलंब करत आहेत.
लोकांमध्ये नितीमूल्य प्रणालीमध्ये लक्षणीय ऱ्हास झालेला आहे .
Written by Adv. Sarika Khude
(Rajgurunagar, Pune)