कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/ Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे.
भाग 6
फ अ.नु. प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल
1 नियोक्त्याचे नाव
2 कोणत्या पदावर/पदनाव
3 मासिक उत्पन्न
4 जर शासकीय नोकरदार असेल तर नवीनतम/चालु पगार प्रमाणपत्र किंवा सध्याचे वेतन स्लिप किंवा बँक खात्यात जमा होत असलेल्याचा पुरावा सादर करा.
5 जर नोकरदार खाजगी क्षेत्रात असेल तर अशा नियोक्ताची पदवी/कोणत्या पदावर नेमणुक आणि अशा व्यक्तीचे एकुण मासीक उत्पन्न दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करा आणि सध्याच्या सबंधीत कालावधीसाठी फॉर्म नं.16 सादर करा
6 सध्याच्या रोजगाराच्या वेळी नियोक्त्यांकडुन काही परवाणग्या, लाभ घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, महागाई भत्ता किंवा इतर कोणत्याही सेवा लाभ प्रदान केल्या जात असतील तर त्याचा तपशिल
7 उत्पन्न कर आकारले गेले आहे किंवा कसे
जर उत्पन्न कर आकारले गेले असेल तर आयकराची खालील कागदपत्र सादर करा
अ)लग्नाचे पुर्वीचे एक वर्षाचे आयकर
ब)विभक्त होण्यापुर्वीचे एक वर्षाचे आयकर
क)अर्ज दाखल केला होता त्या वेळचे आयकराचे कागदपत्र
8 प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षास इतर अन्य स्त्रोताकडुन जसे की, भाडे, व्याज, समभाग, लाभांश, भांडवली नफा, एफ डी आर एस, पोस्ट कार्यालय ठेवी, म्युच्युवल फंड, स्टॉक, डिबेंचर्स, शेती किंवा व्यवसाय असल्यास टीडीएस मध्ये असे कोणतेही उत्पन्न
9 मागील वर्षातील सर्व वित्तीय संस्थाचे खाते उतारे