घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3)
घटस्फोटाच्या केस मध्ये अर्जदार यांचा पुरावा बंद झाल्यानंतर जाब देणाऱ्यांचा पुरावा चालू होतो
जाब देणार हे प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून अर्जदार यांच्या अर्जातील मजकुर व विधाने ही बरोबर नाहीत व अर्जदार यांची मागणी ही कोर्टाने मान्य करु नये यासाठी योग्य ते पुरावे कोर्टात देवुन जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कैफीयत मधील मजकुर व विधाने व मागणी कोर्टात मान्य होणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन जाबदेणार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात
जाब देणाऱ्यांचा पुरावा पूर्ण झाल्यानंतर जाब देणार हे पुरावा बंदची पुरशिस दाखल करतात
त्यानंतर अर्जदार यांचे वकील व जाबदेणाऱ्यांचे वकील हे युक्तिवाद करतात
दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट हे दोन्ही पक्षाचे पुराव्याची पाहणी-छाटणी करुन ऑर्डर करतात
www.advocatesarika.com