Skip to main content

Posts

Showing posts with the label #divorce #rajgurunagar #rajgurunagarcourt #divorcelawyer

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2) घटस्फोटाच्या केस मध्ये मुद्दे-ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो अर्जदार प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वतःच्या अर्जामधील मजकुर- विधाने सिध्द करण्यासाठी व मागणी कोर्टांनी मान्य करणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन अर्जदार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात सदर पुराव्यांना कोट हे निशाणी देते अर्जदार यांचा पुरावा संपल्यानंतर अर्जदार हा evidence closeकिंवा पुरावा बंदची पुरशिस अर्जदार हे दाखल करतात www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 1)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया ( भाग 1) घटस्फोट केस कोर्टात दाखल केल्यानंतर जाब देणाऱ्यांना बेलिफांच्या मार्फत नोटीस पाठवली जाते नोटीस ची बजावणी झाल्यानंतर जाब देणार हा कोर्टात वकिलांमार्फत हजर राहतो जाबदेणार कोर्टात हजर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जाब देणाऱ्याला कैफियत दाखल करावी लागते सदर कैफियत दाखल केल्यानंतर कोर्ट हे अर्जदाराचा अर्ज व जाबदेणार याचा जबाब यावर मुद्दे (ISSUE) काढतात ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो www.advocatesarika.com

पोटगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 पोटगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 1)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याचे पगार पत्रक 2)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे असणारे सर्व प्रॉपर्टी चे कागदपत्र उदाहरणार्थ शेतजमीन, घर मिळकत, ऑफिस, व्यवसायाच्या ठिकाणी असलेली मिळकत, व्यवसायिक गाड्या, भाड्याने दिलेली घरे इत्यादीची माहिती देणारी कागदपत्रे 3)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे आहे त्याच्या नावे कोणताही व्यवसाय असेल किंवा कोणत्याही व्यवसायापासून त्याला ठराविक रक्कम दरमहा मिळत असेल तर त्याचे सर्व कागदपत्रे 4)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याचा ऑनलाईन बिझनेस असेल तर त्या ऑनलाईन बिझनेसचे कागदपत्र ,ऑनलाइन लिंक, ऑनलाइन बिजनेस बाबतची माहिती 6)ज्याच्या विरुद्ध आपल्याला पोटगी मागायचे असेल त्याच्या नावे असणारी बँकेमध्ये किंवा सहकारी पतसंस्थेमध्ये असलेली फिक्स डिपॉझिट, सेविंग अकाउंट, इतर ठेवी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक याची कागदपत्रे

जन्माची नोंद व मृत्युची नोंद

 जेव्हा बाळाच्या जन्माची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मुलाच्या जन्माच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मुलाच्या आई-वडीलांचे आधार कार्ड 2)लाईटबील/लायसन्स 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मुलांचा जन्माची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)मुलाचा जग्न ज्या दवाखान्यात झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मुलाचा जन्म त्या दिवशी झाला आहे. उदा. शाळेचे आयडी कार्ड, रेशन कार्ड इत्यादी जेव्हा व्यक्तीच्या मृत्युची नोंद एक वर्षाच्या कालावधीमध्ये केली नाही तर सदर मृत्युच्या नोंदी करता कोर्टामध्ये खटला दाखल करावा लागतो त्या कामी लागणारी कागदपत्रे 1)मयत व्यक्तीचे आधार कार्ड, जो खडला दाखल करणार आहे त्यांचे आधार कार्ड 2)मयत व्यक्तीची नोंद असलेले रेशन कार्ड 3)ग्रामपंचायत/नगरपरिषद यांच्याकडील मयत व्यक्तीच्या मृत्युची नोंद उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला 4)ज्या दवाखन्यात मयत व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे मेडिकल सर्टीफिकेट/असा कागदोपत्री पुरावा ज्यावर असे समजेल की मयत व्यक्ती चा त्या दिवशी  मृत्यु झाला आहे.

चेक देणाऱ्याने घ्यावयाची काळजी

 चेक देणाऱ्याने घ्यावयाची काळजी 1)चेक देताना चेक वरील सर्व माहिती तारखेसहित भरून देणे 2)चेक आपण कशासाठी देत आहोत याचा एक करारनामा करणे. 3)चेक हा सिक्युरिटी म्हणून दिला असल्यास व त्याबाबत लेखी स्वरूपात पुरावा असल्यास चेक बाउन्स केस मध्ये चेक देणार यास फायदा होतो 4)कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचा करारनामा करून ठेवावा हात उसने कर्ज घेतल्यानंतर काही काळानंतर जर कर्ज फेडले असेल तर सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक हा परत घेणे. 5)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर  देखील चेक परत देत नसेल तर चेक घेणारा व्यक्तीस वकिलाऺमार्फत लीगल नोटीस पाठवावी 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर  देखील चेक परत देत नसेल तर त्याच्या विरुद्ध किंवा चेक हरवल्याची/चेक गहाळ झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करणे 6)चेक घेणारा व्यक्ती त्याचे पैशाची परतफेड केल्यानंतर   देखील चेक परत देत नसेल तर सदर चेकचे ट्रांजेक्शन थांबवण्यासाठी बँकेस लिखित स्वरूपात किंवा मेल द्वारे कल्पना देणे

कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना

 कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही मे. कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. हे दस्तऐवज न्यायालयाला तुमच्या हेतूंबद्दल माहिती देणे, आवश्यक माहिती प्रदान करणे आणि घटस्फोटाची न्याय्य आणि कायदेशीर प्रक्रिया सुनिश्चित करणे यासह अनेक उद्देश पूर्ण करतात. येथे सामान्यत: आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सूची आणि त्यांची आवश्यकता का आहे याचे स्पष्टीकरण आहे: घटस्फोटासाठी याचिका समन्स आर्थिक प्रतिज्ञापत्र बाल कस्टडी मालमत्ता आणि कर्ज विवरण वैवाहिक समझोता करार (लागू असल्यास) सेवेचा पुरावा तात्पुरत्या ऑर्डरसाठी विनंती (आवश्यक असल्यास): सुनावणीची सूचना विवाह प्रमाणपत्र: फाइलिंग फी: यातील प्रत्येक दस्तऐवज घटस्फोट प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ते न्यायालयाला तुमच्या केसचे तपशील समजून घेण्यात, दोन्ही पक्षांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करण्यास आणि न्याय्य आणि कायदेशीर घटस्फोट सुनिश्चित करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, या दस्तऐवजांमध्ये अचूक आणि संपूर्ण माहिती प्रदान करणे हे घटस्फोटाचा यशस्वी परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक आहे.

कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी

 कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. येथे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे: कागदपत्रे- 1)दाखल करणाऱ्याचा आय डी साईज फोटो (आवश्यक) 2)दाखल करण्याऱ्याचे आधार कार्ड (आवश्यक) 3)लग्न पत्रिका / विवाह प्रमाणपत्र (कार्यालयाचे/रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट)(आवश्यक) 4)लग्नातील फोटो(आवश्यक) 5)कायम स्वरुपी रहात असलेल्या ठिकाणचे लाईट बील/भाडेपट्टा करार (जर असेल तर) 6)पोलीस तक्रार (जर असेल तर) 7)वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस (जर असेल तर) 8)लग्नामध्ये केलेल्या खर्चाच्या पावत्या (जर असतील तर) वरिल दिलेल्या कागदपत्रांमधील आवश्यक असलेली कागदपत्रे  उपलब्ध  नसतील /होणार नसतील तर त्याच्या पुष्टीसाठी स्वतंत्र अॅफिडेव्हीट कोर्टात द्यावे लागते.   By Adv. Sarika khude Rajgurunagar, Pune

List of Documents for Divorce I घटस्फोटा साठी लागणारी कागदपत्रांची यादी

कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल होणेसाठी, तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध कागदपत्रे ही कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. येथे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे:  कागदपत्रे- 1)दाखल करणाऱ्याचा आय डी साईज फोटो (आवश्यक) 2)दाखल करण्याऱ्याचे आधार कार्ड (आवश्यक) 3)लग्न पत्रिका / विवाह प्रमाणपत्र (कार्यालयाचे/रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट)(आवश्यक) 4)लग्नातील फोटो(आवश्यक) 5)कायम स्वरुपी रहात असलेल्या ठिकाणचे लाईट बील/भाडेपट्टा करार (जर असेल तर) 6)पोलीस तक्रार (जर असेल तर) 7)वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस (जर असेल तर) 8)लग्नामध्ये केलेल्या खर्चाच्या पावत्या (जर असतील तर) वरिल दिलेल्या कागदपत्रांमधील आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध नसतील /होणार नसतील तर त्याच्या पुष्टीसाठी स्वतंत्र अॅफिडेव्हीट कोर्टात द्यावे लागते. Adv. Sarika Khude Khed Rajgurunagar

#Divorce is not just the end of a #marriage; it's the beginning of a #new battle.

 दिल्लीच्या गजबजलेल्या शहरात, जिथे परंपरा आणि आधुनिकतेचा अनेकदा संघर्ष होत असे, तिथे राज आणि नैना नावाचे जोडपे राहत होते. त्यांच्या लग्नाला एक दशक झाले होते, त्यांचे एकत्रीकरण सुरुवातीला भव्य समारंभ आणि आनंदी उत्सवाने साजरे केले गेले. पण जसजशी वर्ष सरत गेली तसतसे त्यांचे प्रेम न बोललेले शब्द, अपेक्षा आणि गैरसमजांच्या भाराखाली तुटू लागले. राज हा एक यशस्वी उद्योजक होता, महत्वाकांक्षा आणि आर्थिक सुरक्षिततेच्या इच्छेने प्रेरित होता. दुसरीकडे, नैना ही एक स्वतंत्र स्त्री होती जिने आपल्या पतीच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी स्वतःचे करिअर थांबवले होते. जसजशी वर्षं सरत गेली तसतशी नैनाला हरवल्यासारखं वाटू लागलं, कर्तव्यदक्ष पत्नीची भूमिका साकारत असताना तिची स्वप्नं धूसर होत गेली. त्यांच्या येऊ घातलेल्या वियोगाची पहिली कुजबुज एका पावसाळी संध्याकाळी आली जेव्हा राज उशीरा घरी परतला, त्यांची मुलगी रियाचे शाळेतील खेळ चुकवल्यानंतर. वाट पाहून कंटाळलेल्या नैनाने स्वतःच्या निराशेचा सामना केला. कठोर शब्दांची देवाणघेवाण झाली आणि बाहेर वादळाच्या गडगडाटात त्यांनी लग्न मोडण्याचा वेदनादायक निर्णय घेतला. त्यान

Journey From 'We' to 'Me'

    एकेकाळी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात अर्जुन आणि मीरा नावाचे जोडपे राहत होते. ते एक परिपूर्ण जुळणीचे प्रतीक होते, अशा प्रकारचे जोडपे ज्यामुळे लोकांना सोलमेट्सवर विश्वास बसला. त्यांची प्रेमकथा दंतकथांची सामग्री होती, आणि ते अविभाज्य होते, किंवा प्रत्येकाने विचार केला. अर्जुन आणि मीरा कॉलेजमध्ये भेटले होते, परीक्षा आणि लेक्चर्सच्या गोंधळात त्यांचे प्रेम वाढत होते. ते एका दशकाहून अधिक काळ एकत्र होते, जीवनात आलेल्या प्रत्येक वादळाला तोंड देत होते. ते एकत्र हसले, एकत्र रडले आणि एकत्र स्वप्ने बांधली. ते परिपूर्ण "आम्ही" होते. पण जसजसा काळ बदलू लागला तसतशा आयुष्याच्या मागण्या बदलू लागल्या. अर्जुन, एक प्रतिभावान कलाकार, त्याने नेहमीच भव्य स्टेजवर आपले काम प्रदर्शित करण्याचे स्वप्न पाहिले होते. मीरा, एक हुशार वकील, एका प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये कॉर्पोरेटची शिडी चढत होती. त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा केंद्रस्थानी येऊ लागल्या, सूक्ष्मपणे त्यांच्या "आम्ही" ला "माझ्याकडे" ढकलत. एका दुर्दैवी संध्याकाळी, अर्जुन पॅरिसमधील कला प्रदर्शनाचे आमंत्रण घेऊन घरी आला, ही एक स्व