Skip to main content

Posts

Affidavit Of Assets and Liabilities

 कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 1 - वैयक्तीक माहीती भाग 2 - कायदेशीर कारवाही आणि देखभालीचे खर्चाचा तपशिल भाग 3 - अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांचा तपशिल भाग 4 - अवलंबुन असलेल्या सदस्यांकरीता होत असलेल्या वैद्यकीय खर्चाचा तपशील भाग 5 - पक्षांच्या मुलांचा तपशिल भाग 6 - प्रतिज्ञापत्र सदर करण्याचे उत्पन्नाचा तपशिल भाग 7 - प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या पक्षाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता भाग 8 - प्रतिज्ञापत्र सदर करणाऱ्याचे दायीत्वाचा तपशिल भाग 9 - स्वरोजगार व्यक्ती/व्यवसायीक/व्यवसायीक व्यक्ती/उदयोजक भाग 10 - विरुध्द बाजुचे प्रतिज्ञापत्र करणाऱ्याने नमुद केलेले उत्पन्न, मालमत्ता आणि दायीत्वाचा तपशिल भाग 11 - जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा

घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया

   घटस्फोटामधील मेन्टेनन्स- पोटगी ची प्रक्रीया अर्जदारानी घटस्फोटाची केस दाखल केली असेल त्यामध्ये अर्जदार महिला असेल तर तिला घटस्फोटाच्या अर्जा सोबत मेंटेनन्सचा अर्ज देखील दाखल करता येतो जाब देणाऱ्यांना घटस्फोटाच्या केस च्या अर्जाबाबत व मेंटेनन्स अर्जावर कैफियत व जबाब दाखल करावा लागतो मेंटेनन्स अर्ज हा कोर्ट पहिला चालवते प्रथम मेन्टेनन्सच्या अर्जावर ऑर्डर होऊन मेंटेनन्स चालू होतो त्यानंतर अर्जदाराच्या मूळ घटस्फोटाच्या अर्जावर पुढील प्रक्रिया चालू होते पुरुष अर्जदार यांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात केला असेल तर महिला जाबदेणार ही कोर्टात हजर होवुन जबाब दाखल करते त्यावेळी जबाबा सोबत मेन्टेनन्सचा अर्ज दाखल करु शकते. www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3)

   घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 3) घटस्फोटाच्या केस मध्ये अर्जदार यांचा पुरावा बंद झाल्यानंतर जाब देणाऱ्यांचा पुरावा चालू होतो जाब देणार हे प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून अर्जदार यांच्या अर्जातील मजकुर व विधाने ही बरोबर नाहीत व अर्जदार यांची मागणी ही कोर्टाने मान्य करु नये यासाठी योग्य ते पुरावे कोर्टात देवुन जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कैफीयत मधील मजकुर व विधाने व मागणी कोर्टात मान्य होणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन जाबदेणार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात जाब देणाऱ्यांचा पुरावा पूर्ण झाल्यानंतर जाब देणार हे पुरावा बंदची पुरशिस दाखल करतात त्यानंतर अर्जदार यांचे वकील व जाबदेणाऱ्यांचे वकील हे युक्तिवाद करतात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट हे दोन्ही पक्षाचे पुराव्याची पाहणी-छाटणी करुन ऑर्डर करतात www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 2) घटस्फोटाच्या केस मध्ये मुद्दे-ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो अर्जदार प्रथम पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वतःच्या अर्जामधील मजकुर- विधाने सिध्द करण्यासाठी व मागणी कोर्टांनी मान्य करणेसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावा व जे कोणी कोर्टात येवुन अर्जदार यांच्या बाजुने साक्ष देणार आहेत त्या साक्षीदार याना साक्षी समन्स काढून कोर्टात हजर करतात किंवा साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र देवुन त्यांचा तोंडी पुरावा कोर्टात दाखल करतात सदर पुराव्यांना कोट हे निशाणी देते अर्जदार यांचा पुरावा संपल्यानंतर अर्जदार हा evidence closeकिंवा पुरावा बंदची पुरशिस अर्जदार हे दाखल करतात www.advocatesarika.com

घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया (भाग 1)

  घटस्फोटाच्या केस ची प्रक्रीया ( भाग 1) घटस्फोट केस कोर्टात दाखल केल्यानंतर जाब देणाऱ्यांना बेलिफांच्या मार्फत नोटीस पाठवली जाते नोटीस ची बजावणी झाल्यानंतर जाब देणार हा कोर्टात वकिलांमार्फत हजर राहतो जाबदेणार कोर्टात हजर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जाब देणाऱ्याला कैफियत दाखल करावी लागते सदर कैफियत दाखल केल्यानंतर कोर्ट हे अर्जदाराचा अर्ज व जाबदेणार याचा जबाब यावर मुद्दे (ISSUE) काढतात ISSUE निघाल्यानंतर अर्जदार यांना त्यांचा पुरावा चालू करावा लागतो www.advocatesarika.com

वाटप पत्र रजिस्टर करणेकामी लागणारी कागदपत्र

वाटप पत्र रजिस्टर करणेकामी लागणारी कागदपत्र 1)सध्याचा ७/१२ उतारा 2)सध्याचा ८ अ उतारे 3)ज्या फेरफार द्वारे 7/12 उताऱ्यावर नोंद झाली आहे ते सर्व फेरफार 4)ज्या गट नंबर /सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्या गट नंबर/सर्व्हे नंबर चे झालेले सर्व खरेदीखत , साठे खत, हक्कसोडपत्र किंवा कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट याचे कागदपत्र 5)सर्च रिपोर्ट (शक्य असल्यास सन 1954 वर्षापासूनचा असावा) 6)ज्याच्यामध्ये वाटप होणार आहे त्या सर्व वारसदार (वापटपत्र करुन ठेवणार), तसेच मान्यता देणार यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, आयडीसाईज फोटो 7)वाटप करुन ठेवणार तसेच मान्यता देणार यांचे नाते वंशावळ 8)ज्याच्या मृत्यूनंतर पुढील वारसदार यांची नावे फेरफार द्वारे 7/12 उताऱ्याला लागलेली आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले 9)ज्या गटाचे किंवा सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्याच्या चतुःसिमा 10)ज्या गट नंबरचे वाटप करायचे आहे त्यावर जर पिक पाणी कर्ज असेल तर ज्याच्या नावे कर्ज आहे त्याचे सदर पिक पाणी कर्ज फेडण्याचे हमी पत्र

वाटप पत्र करुन मिळणेसाठी/वाटप होणेसाठी कोर्टात

शेत जमीन मिळकतीचे वाटप पत्र करुन मिळणेसाठी/वाटप होणेसाठी कोर्टात दावा दाखल करणेसाठी लागणारी कागदपत्रे 1)सध्याचा ७/१२ उतारा 2)सध्याचा ८ अ उतारे 3)ज्या फेरफार द्वारे 7/12 उताऱ्यावर नोंद झाली आहे ते सर्व फेरफार 4)ज्या गट नंबर /सर्व्हे नंबरचे वाटप करुन मागायचे आहे त्या गट नंबर/सर्व्हे नंबर चे झालेले सर्व खरेदीखत , साठे खत, हक्कसोडपत्र किंवा कोणताही रजिस्टर डॉक्युमेंट याचे कागदपत्र 5)सर्च रिपोर्ट (शक्य असल्यास सन 1954 वर्षापासूनचा असावा) 6)ज्या गट नंबर/सर्व्हे नंबरचे वाटप करून मागणाऱ्याचे म्हणजे वादी यांचे आधार कार्ड 7)वादी व प्रतिवादी यांचे नाते वंशावळ 8)ज्याच्या मृत्यूनंतर पुढील वारसदार (वादी -प्रतिवादी) यांची नावे फेरफार द्वारे 7/12 उताऱ्याला लागलेली आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले 9)ज्या गटाचे किंवा सर्व्हे नंबरचे वाटप करायचे आहे त्याच्या चतुःसिमा 10)वाटप करुन मिळणेकामी प्रतिवादी यांना वादी यांनी वकीलांमार्फत पाठवलेली लिगल नोटीस 11)वाटप करुन मिळणेसाठी पाठवलेल्या वादी यांच्या लिगल नोटीसीस प्रतिवादी यांनी त्यांच्या वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस 12)सदर जमिन मिळकतीबाबत भरलेल्या कर पावत्या.