भारतीय दंड संहितेच्या कलम 498 आणि भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 113 मधील फरक आरोपी विरुध्द जोपर्यंत सबळ पुरावा येत नाही तोपर्यंत त्यास शिक्षा करता येणार नाही. न्यायालयासमोर जो पुरावा येईल तो विश्वासार्ह असला पाहिजे. आरोपीला संशयाचा फायदा देताना जो पुरावा आला असेल तो पुरावा संशयास्पद असलाच पाहिजे. विवाहीत स्त्रीने लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल तर इंडियन इव्हिडन्स अॅक्ट सेक्शन 113 अ (विवाहीत स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गृहीतक) च्या तरतुदी लागु होतात. इंडियन कॉन्टीटुशन सन 1983 साली सेक्शन 113 अ हे सेक्शन इंडियन इव्हिडन्स अॅक्ट यात दुरुस्ती करुन समाविष्ट केले. मात्र पती आणि त्याचे नातेवाईक यांनी विवाहीत स्त्रीचा हुंड्याकरिता छळ केला, तिच्यावर जुलुम जबरदस्ती केली, याबाबतचा सबळ पुरावा फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा जेव्हा सादर केला जाईल तेव्हांच पतीने व त्याच्या नातेवाईकाने हुंड्याकरिता पत्नीचा छळ केला व तिच्यावर जुलुम जबरदस्ती केली व तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे गृहीत धरता येईल. हुंडा या शब्दानेच क्लेश...
We Make Law Easy For Everyone