Skip to main content

Cruelty, Abetment to Suicide, and Culpable Homicide in the Indian Penal Code


 लग्न झाल्यानंतर 7 वर्षांच्या आत पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. पतीने व त्याच्या नातेवाईकांनी मयत स्त्रीचा हुंड्यावरुन छळ केला, जुलुम केला, तिला त्रास दिला याबाबतचा पुरावा न्यायालयासमोर आला नाही. सबब आरोपी हुंडाबळी व आत्महत्येस चिथावणी देणे खाली गुन्हेगार ठरविता येणार नाही.
पतीने पत्नीला हुंड्यावरुन अनेकवेळा मारहाण केली त्यामुळे तिला तिच्या काकांच्या घरी जाणे भाग पडले तेथून ती परत पतीकडे नांदायला आली नाही सेक्शन 498 अ प्रमाणे पतीने गुन्हा केला आहे हे प्रथमदर्शनी सिध्द होते सबब पतीविरुध्द दाखल झालेला खटला काढून टाकता येणार नाही.
पती व त्यांच्या बहीणीविरुध्द हुंड्यावरुन त्रास दिला म्हणून केस दाखल केली. बहिणीविरुध्द सबळ इव्हिडन्स न्यायालयासमोर आला नाही सबब बहिणीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने फिर्याद दाखल करण्यास झालेला उशीर पण माफ केला.
हुंड्यावरुन पतीने पत्नीचा छळ केला त्यामुळे तिने आत्महत्या केली. पतीच्या वडिलांनी असा पुरावा दिला की पतीची हुंड्याची जी मागणी होती त्याबाबत पंचायत बोलावण्यात आली होती ही बाब न्यायालयात सिध्द झाली. पत्नीने आत्महत्या केली तेव्हा ती गर्भवती होती तसेच तिला दीड वर्षांचा मुलगाही होता. मात्र पतीच्या त्रासामुळे पत्नीला आत्महत्या करणे भाग पडले. हुंडाबळीच्या कलमा प्रमाणे आरोपीस न्यायालयाने दोषी धरले.
मुस्लीम कायद्याप्रमाणे मुलाचा ताबा वडिलांकडे दिला जातो.
Parsi Marriage and Divorce Act प्रमाणे मुलाचा ताबा जरी वडिलांकडे असेल तरी मुलाचे शिक्षण, पालनपोषण इ. बाबत निर्णय घेण्याचा फक्त वडिलांचाच अधिकार रहात नाही.
Divorce Act प्रमाणे judicial separation -न्यायिक विभक्तपणाचा आदेश झाला असला तरी guardians and wards act प्रमाणे वय 16 पेक्षा जास्त असेल आणि मुलीचे वय 13 पेक्षा जास्त असेल तर वडिल त्यांच्या ताब्याकरिता अर्ज करु शकतात.
मुलाचे फिजिकल, मेन्टल रिलिजस हित आणि कुणाबद्दल जास्त प्रेम वाटते ते महत्त्वाचे आहे.
मुलगी आपल्या आजी आजोबांजवळ आनंदात रहात. होती आजही आजोबांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मुलीची आई होस्टेलवर रहात होती. त्यामुळे मुलीच्या आईने मुलीच्या ताब्या करता केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.
मुलाने त्याला कोणाजवळ रहावयाचे आहे याबाबत व्यक्त केलेले मत महत्त्वाचा पुरावा असतो.
पालकांपैकी एकाजवळ मुलाचा ताबा द्यावा असा आदेश न्यायालयाने केला मात्र पुढे परिस्थिती बदलली आणि ज्या पालकांजवळ मूल आहे तेथे ते असुरक्षित आहे व मुलाच्या भविष्याच्या दृष्टिने संबंधित व्यक्तीजवळ ताबा असणे चुकिचे आहे असे सिध्द झाले तर न्यायालय पूर्वीचा दिलेला आदेश रद्द करु शकतो व दुसऱ्या पालकाजवळ ताबा देण्याचा आदेश करु शकते.
वैद्यकीय सुविधांमध्ये न्यायालय doctor यांना कोर्ट कमिशन नेमून पक्षकारांच्या शारिरीक तपासण्या करण्याचा आदेश देऊ शकते. यामुळे Article 21 of Indian Constitution च्या जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रमाणे Personal Liberty वर घाला घातला गेला असे समजता येणार नाही.


Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावे...

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात ...

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के    जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल --    अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील     --    असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे     --    परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घर...