Skip to main content

भारतीय दंड संहितेच्या कलम 498 आणि भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 113 मधील फरक

भारतीय दंड संहितेच्या कलम 498 आणि भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 113 मधील फरक

 आरोपी विरुध्द जोपर्यंत सबळ पुरावा येत नाही तोपर्यंत त्यास शिक्षा करता येणार नाही. न्यायालयासमोर जो पुरावा येईल तो विश्वासार्ह असला पाहिजे. आरोपीला संशयाचा फायदा देताना जो पुरावा आला असेल तो पुरावा संशयास्पद असलाच पाहिजे.
विवाहीत स्त्रीने लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल तर इंडियन इव्हिडन्स अॅक्ट सेक्शन 113 अ (विवाहीत स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गृहीतक) च्या तरतुदी लागु होतात. इंडियन कॉन्टीटुशन सन 1983 साली सेक्शन 113 अ हे सेक्शन इंडियन इव्हिडन्स अॅक्ट यात दुरुस्ती करुन समाविष्ट केले. मात्र पती आणि त्याचे नातेवाईक यांनी विवाहीत स्त्रीचा हुंड्याकरिता छळ केला, तिच्यावर जुलुम जबरदस्ती केली, याबाबतचा सबळ पुरावा फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा जेव्हा सादर केला जाईल तेव्हांच पतीने व त्याच्या नातेवाईकाने हुंड्याकरिता पत्नीचा छळ केला व तिच्यावर जुलुम जबरदस्ती केली व तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे गृहीत धरता येईल.
हुंडा या शब्दानेच क्लेश होतात, कारण त्यामुळे मुलीवर व तिच्या आई वडिलांवर आघात होतो. हुंड्याचि मागणी साधारणपणे तीन प्रसंगानी होते अ)लग्नापूर्वी ब)लग्नाच्या वेळेस क)लग्नानंतर. हुंडा म्हणून अमर्यादित मागण्या केल्या जातात. मुलीने किंवा तिच्या आई वडिलांनी कितीही मागण्या पूर्ण केल्या तरी असमाधानी व्यक्तीचे कधीही समाधान होत नाही. त्याचे पर्यवसान Consequences असे होते की, ज्या विवाहीत स्त्रीवर हुंड्याकरिता जुलुम होतो ती स्त्री एकतर आत्महत्या करते किंवा तिचा खून केला जातो असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
नव विवाहितेचा छळ झाला व ती भाजून मेली याबाबतचा इव्हिडन्स फिर्यादी पक्षाने सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रथम चौकशी अहवालात पतीने पत्नीस जाळून मारले हे नमुद असले तरी त्यामुळे पतीविरुध्दचे आरोप शाबित होत नाहीत. सबब पतीस सेक्शन 498अ व हुंडाबळी प्रमाणे दोषी धरता येणार नाही.
पतीने पत्नीचा हुंड्याकरिता छळ केला व तिला जाळून मारले, पतीने असा बचाव घेतला की, पत्नीचा मृत्यु हा अपघाताने झाला आहे. पती पत्नीकडे रोख रकमेची मागणी करित असे. तसेच मारुती गाडी मागत असे ही बाब पत्रावरुन सिध्द झाली सबब इव्हीडन्स अॅक्ट सेक्शन 113 अ प्रमाणे पतीने पत्नीचा हुंड्याकरिता छळ केला हे गृहीत धरले गेले. पती व त्याच्या आई वडिलांना आय पी सी सेक्शन 306 (आत्महत्येस चिथावणी देणे) आणि 498 अ प्रमाणे शिक्षा केली गेली.
सेक्शन 113 अ प्रमाणे गृहीत धरतांना All circumstantial पुरावा बघणे आवश्यक आहे पती व पत्नींमधील संबंध, पत्नीच्या मृत्युमागील कारण न्यायालयासमोर सबळ पुराव्याने सिध्द होणे आवश्यक आहे. पतीने पत्नीच्या आत्महत्येस प्रोत्साहन दिले हे सिध्द होणे आवश्यक आहे. पत्नी दररोजची दैनंदिनी लिहीत असे. पत्नीने आत्महत्या केली त्याचे कारण दैनंदिनीत लिहिले नव्हते. पत्नीची दैनंदिनी हा तिचा मृत्युपूर्व जबाब आहे व तो पुरावा म्हणून वाचता येईल असे मत न्यायालयाने नोंदविले.
हुंडा म्हणून कोणत्याही मालमत्तेचा अंतर्भाव होतो. मात्र मालमत्तेची मागणी विवाहाच्या संर्द्भातच असली पाहीजे. विवाहा व्यतिरिक्त व विवाहाशी संबंधित अशी कोणतीही मागणी नसेल तर हुंडा या संज्ञेत ती मागणी येत नाही. लग्न झाल्यानंतर इतर कोणत्याही समारंभात परंपरेप्रमाणे एकमेकांना भेट वस्तू दिल्या गेल्या तर त्या दिलेल्या भेट वस्तु हुंडा या संज्ञेत येत नाहीत.
विवाहितेचा मृत्यु लग्न झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत हुंड्याच्या कारणावरुन झाला. पती पत्नीला हुंड्यावरुन खूप छळत असे ही बाब पत्नीच्या वडिलांच्या व भावाच्या साक्षीवरुन सिध्द झाली. सबब पतीने हुंडाबळी प्रमाणे गुन्हा केला आहे हे सिध्द होते मात्र पतीने पत्नीचा खून केला आहे हे यावरुन सिध्द होत नाही.
पती त्याची आई, बहीण यांनी पत्नीचा हुंड्यावरुन छळ केला. पत्नीने न्यायालयात पोटगीकरता अर्ज केला. पती व त्याच्या नातेवाईकांच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. न्यायालयाने आय पी सी च्या आत्महत्येस चिथावणी देणे, 498, समान उद्देश साद्य करण्याकरिता दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेल्या कृती प्रमाणे पती व त्यांचे नातेवाईकांना शिक्षा ठोठावली.
लग्नापुर्वी पत्नीच्या आईने आणि बहिणीने हुंड्याची रक्कम पतीला दिली मात्र बहिणीच्या जबाबात तिने आपण आईबरोबर हुंड्याची रक्कम द्यायला गेलो होतो असे न सांगता हुंड्याची रक्कम मी दिली असे सांगितले. पुराव्यातील या तफावतीचा फायदा आरोपीस घेता येणार नाही. आरोपी Dowry Prevention Act च्या हुंडा देणे किंवा घेणे दंड, हुंडा मागितल्यास दंड, हुंडा पत्नी किंवा तिच्या वारसांच्या फायद्यासाठी असावा( Penalty for giving or taking dowry, Penalty for demanding dowry, Dowry to be for the benefit of the wife or her heirs) या प्रमाणे शिक्षेस पात्र आहे असे मत न्यायालयाने नोंदवले.

 

Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्