Skip to main content

Property Distribution Individuals Who Receive A Share

Property Distribution Individuals Who Receive A Share 

Property Distribution Individuals Who Receive A Share
Property Distribution Individuals Who Receive A Share 

वाटपामध्ये ज्यांना हिस्सा प्राप्त होतो त्या व्यक्ती-

सर्वसाधारण प्रत्येक सहदायिक जो सहहिस्सेदार आहे त्याला वाटप मागण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक सहहिस्सेदाराला वाटपामध्ये त्याचा हिस्सा मिळतो. पूर्वी स्त्रियांना वाटप मागण्याचा हक्क नव्हता परंतु १९५६ नंतर विधवेस एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील हिस्सा मागता येतो. अलिकडे महाराष्ट्र सरकारने मुलींना मुलाइतकाच हक्क सहदायिक म्हणून 1994साली दिलेला आहे. २२ जून 1994 नंतर ज्यांची लग्ने झालेली आहेत त्यांना अगर एकत्र कुटुंबातील कुमारिकांना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करुन मागण्याचा हक्क आहे. हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) कलम 6प्रमाणे विधवा, मुली, आई, मयत मुलाची मुलगी वगैरेंना हक्क दिलेले आहेत. तेव्हा त्यांनाही वाटपात हिस्सा मिळतो. तसेच एकत्र कुटुंबातील ज्यांनी मिळकत खरेदी केली आहे त्यांसही वाटप करुन मागता येते. पात्रता नसलेल्या सहहिस्सेदारास वाटप करुन मागता येत नाही आणि बाम्बे स्कूलप्रमाणे वडील जर आजोबांसहित राहत असतील तर मुलाला वाटप मागता येत नाही. हिंदू कायद्याप्रमाणे वडिलांना स्वतःला एकट्यास मुलामध्ये वाटप करुन देण्याचा अधिकार आहे.

एक अष्टमांश हिश्शाचे मृत्युपत्र करता येते-

वडील १९५७ साली म्हणजे दि.१७/०६/१९५६ रोजी नंतर हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) आल्यानंतर मयत झाले. त्यामुळे विधवा स्त्री आणि तिच्या सर्व मुलींना मिळकतीत सारखा हिस्सा येतो. आईने सात मुलींपैकी एका मुलीच्या नावाने मृत्युपत्र केले. मृत्युपत्रात सर्व मिळकत विधवा मुलीच्या नावे केली. तर अशा परिस्थितीत आईला एक अष्टमांश मिळकतीचेच मृत्युपत्र करता येईल.

या केसमध्ये श्रीमती रमाबाई हिने ती स्वतः एकटी मालक मृत्युपत्राने झाली आहे असा जाहीर ठराव करुन मागण्यासाठी आणि प्रतिवादींनी तिच्या कब्जाला हरकत करु नये म्हणून मनाई हुकूमाचा दावा लावला होता. या केसमध्ये प्रतिवादी नं.१ ते ५ या वादीच्या बहिणी होत्या. प्रतिवादी नं.६ ते ८ ही एक बहिणीची मुले होती. दावा मिळकत या प्रतिवादी नं.१ ते ५ चे वडील माधव आणि आई यमुनाबाई यांच्या होत्या. माधव मयत झाल्यानंतर यमुनाबाईने मृत्यूपत्र केले होते व ती सन १९८० साली वारली. त्यानंतर वादीकडे जमिनी आल्या. माधव मेल्यानंतर त्याच्या सर्व वारसांची नावे लागली आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यामुळे वादीने दावा लावला. प्रतिवादीचे म्हणणे असे होते की, दावा मिळकत एकत्र कुटुंबाची होती. माधव मयत झाल्यावर आई एकटी मालक होत नसून सर्व मुलींना समान हक्क येतो. घरही सर्वांचे आहे. वादीचे वडिल माधव सन 1956 साली मयत झाला त्यामुळे Hindu Succession Act, १९५६ प्रमाणे त्यामधील कलमे लागू होतात. प्रतिवादीचे म्हणणे असे की, यमुनाबाईने मृत्युपत्र केले नव्हते. ते प्रतिवादीवर बंधनकारक नाही आणि वादीचा हिस्सा फक्त एक सप्तमांश आहे. त्यामुळे ताकीदही हेता येणार नाही. या केसमध्ये तिचा हिस्सा धरुन आईचा एक अष्टमांश हिस्सा तिला दिला.

या केसमध्ये एक साक्षीदार मृत्युपत्रावरचा तपासला गेला होता आणि टायपिस्ट याला तपासण्याची जरुर नव्हती असे कथन केले आहे. कारण तो साक्षीदार होत नाही. तसेच वकील तपासले नाहीत म्हणून मृत्युपत्र खोटे ठरत नाही.

पत्नीस वाटपास दावा लावता येत नाही-

एकत्र कुटुंबाच्या स्त्रीला माप आणि सीमांकन (Metes and Bounds) साठी वाटपाचा दावा लावता येत नाही. कारण हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) मध्ये त्या विषयाचा विचार केलेला नाही. पत्नी ही सहदायिक नाही. तिला दावा लावता येत नाही. हिंदू कायद्याच्या सर्वसाधारण तत्त्वाखाली तिला वाटपाचा दावा लावण्याचा हक्क नाही आणि तिचे लग्न झाल्यानंतर हिंदू कुटुंबात तिची सभासद म्हणून मान्यता संपते.

वारसाहक्क कोणाला व कधी येतात-

दाव्याच्या परिशिष्टामध्ये ज्या मिळकती दर्शविल्या असतील, त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती असतील, त्यातील एक सभासद मयत झाला असेल तर त्याचा वारसा क्लास १ मधील व्यक्तींना एकसारखा येईल.

Patitionच्या दाव्यात जरुरीचे Parties (Plaintiff and defendent)-

वाटपाच्या दाव्यात जरुरीचे पक्षकार सामील करावेच लागतात. वडिलोपर्जित Joint Family मधील Daughter जी वादीची बहिण-Sister आहे क्लास १ वारस म्हणून येते व तील सामील केले नसेल तर वादीचा दावा कायद्याने चालत नाही.

वाटपामध्ये ज्यांना हिस्सा प्राप्त होत नाही अशा व्यक्ती-

) हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act), १९५६ च्या कायद्याप्रमाणे मुलाच्या मुलाची विधवा, भावाची विधवा यांनी वाटप दिनांकाच्या वेळेस दुसरे लग्न केले असल्यास वाटपाच्या वेळी त्यांना हिस्सा मिळकत नाही. परंतु आता हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) प्रमाणे नवीन दुरुस्ती २००५ साली आली आहे व सदरचा कलम 24 हा रद्द केले आहे.

) कलम-25: ज्या पुरुषाने एखाद्याचा खून-Murder केला असेल किंवा तो खूनामध्ये सहभागीदार असेल तर त्याला मयताच्या मिळकतीमध्ये Hindu Succession Act प्रमाणे हक्क मिळकत नाही.

) कलम-26:Hindu Succession Act, 1956 अमलात येण्याअगोदर अथवा नंतर एखादी व्यक्ती हिंदू राहीली नसेल किंवा तीने धर्मांतर केल असेल अशी व्यक्ती व तीला त्यानंतर झालेली मुले व त्यांचे वारस यांना हिंदू धर्माच्या नातेवाईकाच्या मिळकतीवर वारसा सांगता येत नाही.

) कलम 27: Hindu Succession Act, 1956प्रमाणे जर एखादी व्यक्ती अनर्ह-अपरिपक्व (Worthless/disqualified ) वाटपाबाबत ठरवली असेल तर जणू काही ती मयत आहे असे समजून वाटप केले जाते. परंतू कलम 4 व कलम14 विधवेची शीलभ्रष्टता (Immorality) तीला disqualified ठरवित नाही. Immorality विधवेला तिच्या नवऱ्याचा हिस्सा मिळण्यास कायद्याची आडकाठी नाही.

उदा. Joint Family Property आहे याची शहानिशी करावी लागते. Joint Family तून पैसा आला हे वादीला दाखवावे लागते. दाव्यातील मिळकती या वादीच्या सावत्र आईच्या नावाने खरेदी केल्या होत्या आणि हे खरेदीपत्र वादीचे वडिल व आजोबा असताना केले होते. कुटुंबाकडे पुरेशी साधने खरेदी घेण्यासाठी होती, हे वादीला शाबीत करता आले नाही, तेव्हा दावा मिळकती या सावत्र आईसाठी खरेदी झाल्या असे ग्राह्य धरले जाते व वादीचा दावा रद्द केला जातो.

) Joint Family च्या वाटपामध्ये निरनिराळ्या शाखा सहदायिकाच्या असतात तेव्हा वाटपाच्या वेळी तेथील शाखांना दरडोई आणि शाखानुसार हिस्सा मिळतो. शाखांचा जो प्रमुख असतो तो जो एका कुटुंबीयापुरता स्वतःला प्रतिनिधित्व करतो त्यास शाखेतर्फे वाटप मिळते.

) परंतु शाखाप्रमुख ज्या वेळी अस्तित्वात नसेल तेव्हा त्याच्या कुटुंबियातील प्रत्येकाला हिस्सा प्राप्त होतो. उदा. एका कुटुंबामध्ये चार मुले आहेत व वडिल वारलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये वाटप करावयाचे झाल्यास प्रत्येकी एक चतुर्थांश हिस्सा त्यांना त्यांच्या शाखेचा प्राप्त होईल. त्यापैकी एखादा मुलगा मयत झाल्यास त्यांच्या वारसास सामील करुन त्याचा हिस्सा काढला जातो. अशा रितीने हिंदू कायद्याप्रमाणे हिस्सा दिला जातो

जी) हिंदू कायद्याच्या तत्त्वाप्रमाणे जर स्त्रिया कुटुंबामध्ये असतील तर त्यांना वाटपाच्या वेळी हिस्सा मिळतो. जर वाटप नवरा व मुलांमध्ये झाले तर त्यांना हिस्सा मिळतो.

एच) जो उपजत वेडा आहे त्याला मात्र वाटपात हिस्सा मिळत नाही. परंतु त्याच्या मुलांना तो मिळू शकतो.

वादीचा दावा वाटपाचा व स्वतंत्र कब्जाचा होता. वादी पत्नी व मुलगी आहेत. त्यांचे मयताशी असलेले नाते, पत्नी व मुलगी हे नाकारले व त्याबद्दल तक्रार मुलीचा जन्माचा उतारा व शाळेचे सर्टिफिकेटचा पुरावा दिला तसाच वादी व प्रतिवादी नातेवाईकांचा खास दिला त्यामुळे नाते शाबित झाले त्यामुळे वादींना ½हिस्सा प्राप्त होतो. या केसमध्ये विधवा ही 1937 च्या पुर्वीची होती, परंतु तिला पोटगीचा हक्क होता व तिचा कब्जा होता. १९५६ नंतर तिचा हिस्सा कलम १४ प्रमाणे पूर्ण मालीचा झाला.

हिंदू स्त्री ही मृत्यूपत्र न करता मुलगा व नवरा मागे ठेवून मयत झाली तर या ठिकाणी हिंदू स्त्रीयांच्या बाबतीतील उत्तराधिकाराचे नियमाप्रमाणे -पहिल्यांदा पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती यांच्याकडे म्हणजेच कलम १५ (1) लागू होतो. वादी मुलाला त्याचा हिस्सा मिळतो. जेव्हा मुलगा किंवा मुलगी नसेल तेव्हा म्हणजेच दुसऱ्यांदा पतीच्या वारसदारांकडे म्हणजेच कलम १५(2) लागू होतो.

ज्याने आपल्या वडिलांचा खून केला आहे त्याला वडिलांच्या इस्टेटीत हक्क येत नाही.

वारसाहक्क पहिल्या लग्नाच्या मुलांना प्राप्त होतो-

वडिलांचा मृत्यू हा Hindu Succession Act, 1956 येण्यापूर्वी झाल. त्यांच्यामागे विधवा बायको आणि एक मुलगी होती. त्यांची मिळकत ही वारसाने विधवेकडे जाते आणि विधवा मयत झाल्यावर ती मिळकत मुलीला मिळते. पहिला नवरा वारल्यानंतर मुलीने दुसरे लग्न केले. तिच्या मृत्यूनंतर तिची मिळकत तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाला व दुसऱ्या नवऱ्यापासून झालेल्या मुलांना प्राप्त होईल. हे म्हणणे बरोबर नाही की, तिच्या पहिल्या नवऱ्याला सासऱ्याची मिळकत मिळेल आणि पहिल्या लग्नाची मुलेस वारस होतील, हे म्हणणे टिकणारे नाही.

    वादीने दावा मिळकतीबाबत पार्टिशन व पझेशनचा दावा दाखल केला असेल व मयत पतीचे विधवेला (वादीला) प्रथम लिमिटेड शेअर तिच्या नवऱ्याचा मिळाला व ती नंतर १९56 साली पूर्ण मालकी ही सदर मिळकतीबाबत तिला आली. वादीचे म्हणणे असे की, तिचे सासरी व दीर वगैरे यांचेमध्ये वाटप झाले नव्हते. वादीचा दावा रद्द झाला. वादी यांनी खालील कोर्टाचे निकालावर नाराज होवून अपील दाखल केले व अपील अनिर्णित असताना वादी मयत झाली. अपेलंटचा भाऊ यांनी अर्ज दिला की, त्याला अपिलात वारस म्हणून दाखल करुन घेणेत यावे. कारण वादी अपेलंट यांनी त्याच्या नावाचे मृत्यूपत्र केले आहे. मयत वादीला मृत्यूपत्र करुन ठेवणेचा कायद्याने हक्क आहे.

    वाटपाच दावा लावला व तो एकट्या वादीने लावला, तो मयत झाला. दाव्यामध्ये वादीचे कायदेशीर वारस हे पक्षकार म्हणून सामील केले गेले नव्हते. कायदेशीर वारसाचा दावा लावण्याचा हक्क राहीला. न्यायालयाने निर्णय दिला, की त्याच्या कायदेशीर वारसाने अर्ज दिल्यानंतर त्यांना वादी म्हणून सामील करुन घेण्यात यावे व दावा पुढे चालू ठेवावा. सदर दाव्यामध्ये वादीचे कायदेशीर वारसांनी स्वतःहून वादी मयत झाल्यानंतर कोर्टामध्ये स्वतः हजर राहून अर्ज करुन स्वतःला वादी म्हणून सामिल करुन घेण्याकामी विनंती करता येते.

    मुलीने वाटपाचा दावा लावला. हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) प्रमाणे नवीन दुरुस्ती २००५ साली आली त्यानंतर मिळकतीचा मालक मयत झाला. त्याची मिळकत त्याचा एकुलता एक मुलगा व चार मुली यांना समान हिश्शाने म्हणजेच प्रत्येकाला १/5 हिश्श्याने त्यांना प्रांप्त होतो. मुलाला इस्टेटीत फक्त १/5 अधिकार- हक्क प्रांप्त होतो. तो मयत झाला व तो जिवंत असताना त्याने सर्व मिळकत एकट्याने विकली. विक्री करणाऱ्यास त्याचा जेवढा मिळकतीचा हिस्सा त्याला प्रांप्त झालेला असेल तेवढीच मिळकत त्याला विक्रीस काढता येते. खरेदीदाराला विक्री करणाऱ्यापेक्षा जास्त मालकी मिळकतीत येत नाही. खरेदीदार फक्त 1/5 हिश्श्याचाच मालक होतो. सर्व मिळकतीचा खरेदीदार मालक होत नाही. खरेदीदार हा मुलींच्या मालकी हक्काच्या मिळकतीत सामाईकदार हिस्सेदार होतो. खरेदीदाराने तो विरुध्द कब्जाने मालक झाला आहे, हे शाबित केले नाही. मुलीच्या बाजूने वाटपाचा दावा मान्य केला. म्हणजेच प्रत्येक मुलींना त्यांचा त्यांचा 1/5 हिस्सा हा मान्य केला.

    हिंदू स्त्री ही मृत्यूपत्र न करता मृत पावली. मिळकत ही तिच्या नवऱ्याची होती. तेव्हा ती मिळकत नवऱ्याच्या वारसाकडे जाते. जे नवऱ्याचे नातेसंबंधित नसतील त्यांच्याकडे जात नाही.

Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावे...

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात ...

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के    जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल --    अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील     --    असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे     --    परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घर...