Qualified Property For Partition - Overview and Analysis वाटपास पात्र मिळकती Qualified Property For Partition - Overview and Analysis मिळकती शाबिती वादीवर असते - सर्व एकत्र कुटुंबाची मिळकत ही वाटपाला पात्र असते . वादीला दाव्यातील मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे हे शाबीत करावे लागते . काही वेळेला जर एखादी मिळकत निरंतर कूळ हक्काने असेल तर ती मिळकत सुध्दा वाटपाला धरली जाते . अविभाज्य संपत्ती जी एकत्र कुटुंबाची आहे तिचे वाटप होत नाही . जंगम मिळकतीचे वाटप होते . एकत्र मिळकतीचे वाटप केले जात नाही - एकत्र कुटुंबातील मूर्ती किंवा देऊळ किंवा देव्हारा , समाधी मंदिर यांचे वाटप केले जात नाही किंवा ते विकले जात नाही . त्या बाबतीत कोर्ट खालीलप्रमाणे मार्ग वापरते . अ ) श्रेष्ठ सहदायिक ( सहहिस्सेदार ) यांना मूर्ती , देऊळ किंवा समाधी वगैरे दिले जाते आणि इतर सर्व हिस्सेदारांना योग्य वेळी प्रार्थना करणेस , पुजा करणेस , भेट देणेस संधी दिली जाते . ब ) सहवारसदार जेवढे आहेत त्यांच्यामध्ये आळीपाळीने त्यांच्या हिश्शाप्रमाणे देऊळ वगैरे धारण करणाऱ्या कोर्ट सुविधा उत्पन्न करुन देते . क ) एकत्र कुटुंबाकड...
We Make Law Easy For Everyone