मृत्युपत्र न करता वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीचे वितरण कसे होते?
![]() |
Distribution Of Property After Father's Death No Will |
दि.९/९/२००५ रोजी हिंदू वारस कायदा दुरुस्ती प्रमाणे - एकत्र कुटुंबाची मालमत्ता असेल तर त्यातील सहहिस्सेदाराच्या मुलीला जन्मतःच सहदायिक म्हणून हक्क मिळतो व तीला मुलाइतकेच समान अधिकार व मिळकतीमध्ये हक्क मुलाइतकेच प्राप्त होतात. तसेच, हा कायदा आल्यानंतर कोणतेही न्यायालय हे मुलगा, नातू किंवा पणतू यांच्याविरुध्द कायदेशीररीत्या कर्जाच्या वसुलीचा दावा वडिल, आजोबा किंवा पणजोबा यांच्या विरुध्द करण्यास परवानगी देणार नाही. या गोष्टी २० डिसेंबर, २००४ पूर्वी झालेल्या वाटणीस लागू पडणार नाहीत.
वर लिहल्याप्रमाणे हिंदू वारसा कायदा, १९५६ हा अमलात आला आहे. हा कायदा अमलात आल्यानंतर प्रथमतःच एका सहहिस्सेदाराच्या मुलीला वाटपात काही हक्क, अधिकार दिले गेले. म्हणजेच मुलींना हक्क प्रथमतःच हिश्शामध्ये बहाल केले. महाराष्ट्र सरकारने मुलींना मिळकतीमध्ये हक्क देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली. ती सन १९९४ साली आली व त्यानंतर आता केंद्र सरकारने कलम ६ हे हिंदू वारसा कायदा, १९५६ मधून वगळले असून त्याऐवजी नवीन कलम ६ प्रमाणे दुरुस्ती करुन मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकाच वारसाहक्क जन्मतः प्राप्त होत आहे. तसेच, कलम23- घराच्या वाटपामध्ये स्त्रीला देणारे जे कलम होते तेही रद्द केले आहे व कलम 24 हेही नवीन कायद्याने रद्द केले आहे. अशा रीतीने, आता मुलींना वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये पुर्ण हक्क प्राप्त झाले आहेत व विधवेला पूर्वीचे हक्क आहेतच.
एकत्र कुटुंबात केवळ पुरुष असून त्यास बायको व मुली आहेत तरी ती Joint family समजली जाईल. तामिळनाडू १९९० साली मुलींना हक्क आला. वाटपाचे दावा-अपील चालू असेल तर मुलीने अर्ज केला तर कलम 29 प्रमाणे तील हक्क दिला जाईल.
जर मालमत्ता- मिळकत वडिलांनी खरेदी केली आहे हे शाबित केले तर कलम 15 प्रमाणे वादी मुलींना हक्क मिळकत नाही.
कलम 29- लग्न न झालेल्या मुलींना मुलाइतकाच हक्क मिळतो.
जेव्हा स्त्रीसभासदास एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत हक्क येत असेल तर ती वाटपाचा दावा लावू शकते व कुटुंबाच्या बाहेर पडून तील तीचा हिस्सा मिळतो व तिचा हक्कही मिळतो.
अमृत्युपत्रीय उत्तराधिकारी २००५ च्या अगोदरचे केंद्र सरकारचे कलम ६ खालिलप्रमाणे:
जेव्हा एखादा हिंदू पुरुष या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या मृत्युसमयी मिताक्षरा सहदायकी संपत्तीत त्याचा हितसंबंध असेल, तेव्हा त्याचा त्या संपत्तीतील हितसंबंध उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार सहदायकीतील उत्तरजीवी सदस्यांकडे प्रक्रांत होईल; या अधिनियमानुसार नव्हे.
परंतु जर मृताच्या मागे, अनुसुचीच्या पहिल्या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या स्त्री-नातलग किंवा जो अशा स्त्री-नातलगांमार्फत दावा सांगतो असा त्या वर्गातील विनिर्दिष्ट पुरुष नातलग हयात असेल तर, मृताचा मिताक्षरा सहदायकी संपत्तीतील हितसंबंध या अधिनियमाखाली, मृत्युपत्रीय किंवा प्रकरणपरत्वे, अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार प्रक्रांत होईल; उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार नव्हे.
स्पष्टीकरण 1- या कलमाच्या प्रयोजनार्थ हिंदू मिताक्षरा सहदायाकाचा हितसंबंध हा त्याच्या मृत्यूच्या निकटपूर्वी जर संपत्तीची वाटणी झाली असती तर त्याला वाटून देण्यात आला असता तेवढा त्या संपत्तीतील हिस्सा असल्याचे मानले जाईल – मग वाटणी होण्याची मागणी करण्यास तो हक्कदार असो वा नसो.
स्पष्टीकरन 2- या कलमाच्या परंतुकात अंतर्गत कोणत्याही गोष्टीमुळे मृताच्या मृत्यूपूर्वी सहदायकीपासून जी स्वतः विभक्त झाली असेल ती किंवा तिच्या वारसामपैकी कोणीही त्यात निर्दिष्ट केलेल्या हितसंबंधातील हिश्शावर दावा सांगण्यास विनामृत्युपत्रीयतेमुळे समर्थ होते, असा त्या गोष्टीचा अर्थ लावला जाणार नाही.
पुरुषांच्या बाबतीत उत्तराधिकारांचे हक्क प्राप्त होणारी कलमे:
मृत्यूपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुषाची संपत्ती या प्रकरणाच्या उपबंधानुसार प्राप्त होतात:
१) जे वारसदार अनुसूचीच्या पहिल्या वर्गामध्ये (उदा.मुलगा, मुलगी, विधवा, आई, मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाची मुलगी, मयत मुलीचा मुलगा, मयत मुलीची मुलगी, मयत मुलाची विधवा पत्नी, मयत मुलाच्या मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाच्या मयत मुलाची मुलगी, मयत मुलाच्या मयत मुलाची विधवा पत्नी) विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे नातलग असतील त्यांच्याकडे;
2) जर पहिल्या वर्गामधील कोणताही वारसदार नसेल तर, जे वारसदार अनुसूचीच्या दुसऱ्या वर्गामध्यील म्हणजेच
अ) वडील.
ब) (1)मुलाची मुलगीचा मुलगा, (2) मुलाची मुलगीची मुलगी (3) भाऊ,(4) बहीण
क) (1)मुलगीच्या मुलाचा मुलगा, (2) मुलगीच्या मुलाची मुलगी, (3)मुलगीच्या मुलगीचा मुलगा, (4)मुलगीची मुलगीची मुलगी.
ड) (1) भावाचा मुलगा, (2) बहिणीचा मुलगा, (3)भावाची मुलगी, (4) बहीणीची मुलगी.
इ) वडीलाचे वडील; वडिलांची आई.
फ) वडिलाची विधवा -(वडिलांची पत्नी); भावाची विधवा (भावाची पत्नी).
जी) वडिलांचा भाऊ; वडिलांची बहीण.
एच) आईचे वडिल; आईची आई
आय) आईचा भाऊ; आईची बहीण
यांचे मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे नातलग असतील त्यांच्याकडे.
3)जर दोहोंपैकी कोणत्याही वर्गाचा कोणताही वारसदार नसेल तर मृताच्या गोत्रजांकडे, आणि
4) जर मृताचा कोणताही गोत्रज नसेल तर त्याच्या भिन्न गोत्रजांकडे
यांचेपैकी एकाकडे संपत्तीचे हक्क जातील.
अनुसूचीच्या पहिल्या वर्गामधील वारसदारांमध्ये मालमत्तेचे वर्गीकरण-पार्टिशन-हिस्सा:
मृत्यूपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुषाची संपत्ती अनुसूचीच्या पहिल्या वर्गातील वारसदारांमध्ये खालील रुल्स प्रमाणे पार्टिशन केले जाते:
1) मृत्यूपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुषाची संपत्ती ही त्याचे विधवेला किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रितपणे हिस्सा मिळेल.
2)will न करता Death झालेल्या हिंदू पुरुषाच्या संपत्तीमध्ये son, मुलगी (Daughter) व आई यांना प्रत्येकी एक हिस्सा मिळेल.
3) मृत्यूपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू पुरुष-व्यक्तीच्या प्रत्येक पूर्वमृत पुत्राच्या किंवा प्रत्येक पूर्वमृत कन्येच्या शाखेतील वारसदारांना आपसात मिळून एक हिस्सा मिळेल.
4) रुल ३ मध्ये निर्दिष केलेल्या हिश्शाचे वितरण-
अ) पूर्वमृत पुत्राच्या शाखेतील वारसदारांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल की, त्याची विधवा किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रितपणे आणि हयात असलेले पुत्र व कन्या यांना समान अंश मिळकतील आणि त्याच्या पूर्वमृत पुत्राच्या शाखेस तेवढाच अंश मिळेल.
ब) पूर्वमृत कन्येच्या शाखेतील वारसदारांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल की, हयात असलेल्या पुत्रांना आणि कन्यांना समान अंश मिळतील.
हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे (Surviviorship चे) General Rule:
अ) मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू स्त्रियांची संपत्ती-मालमत्ता-
1) पुत्र व कन्या (कोणत्याही पुर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती यांच्याकडे
2) पतीच्या वारसदारांकडे
3) माता आणि पिता यांच्याकडे
4) पित्याच्या वारसदारांकडे आणि
5) शेवटी मातेच्या वारसदारांकडे
ब) पोटकलम (1) मध्ये काहीही अंतर्भूत असेल तरी-
A) हिंदू स्त्रीला तीच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती मृताचा कोणताही पुत्र किंवा कन्या (कोणत्याहि पूर्वमृत पुत्राची किंवा कन्येची अपत्ये धरुन) नसल्यास पोट-कलम (1) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्रमानुसार त्यात निर्दिष्ट केलेल्या वारसदारांकडे नव्हे, तर पित्याच्या वारसदारांकडे मालमत्तेचा हिस्सा जातो आणि
B) हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासऱ्याकडून वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, मृताचा कोणताही पुत्र किंवा कन्या (कोणत्याही पूर्वमृत पुत्राची किंवा कन्येची अपत्ये धरुन) नसल्यास, पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्रमानुसार त्यात निर्दिष्ट केलेल्या अन्य वारसदारांकडे नव्हे, तर पतीच्या वारसदारांकडे मालमत्तेचा हिस्सा जातो.
हिंदू विधवेला वाटपाचा दावा तीने दाखल केल्यानंतर त्या दाव्यात पोटगी मागता येते. दावा मिळकती याकरिता मॅनेजर याच्या ताब्यात आहेत तेव्हा विधवेला पोटगी मागण्याचा हक्क आहे.
१९०१ साली हिंदू स्त्री नवऱ्याच्या मिळकतीची वारस झाली असेल. परंतु तिच्यावर काही बंधने ठेवली जातील. हिंदू वारसा कायदा, १९५६ आल्यानंतर तीच्या मर्यादित मालकीचे रुपांतर पूर्ण मालकीत होईल व तीने सन १९६८ रोजी म्हणजेच १९५६ सालानंतर वादीच्या मुलीच्या नावे मृत्युपत्र केले गेले असेल तर वादी त्यामुळे पुर्ण मालक होईन तिला कब्जा मिळण्याचा हक्क प्राप्त होईल.
स्वतंत्र खरेदी केलेल्या मिळकतीत मुलांना हक्क नसतो. वडिलांनी वाटपात मिळकतीतून काही मिळकत खरेदी केली तर ती मिळकत वडिलांच्या मालकीची होते. मुलगा किंवा मुलगे हे वडिलांच्या बरोबर या मिळकतीला सहदायक नसतात.
हिंदू मिताक्षर Joint Family मध्ये मुलगा जन्मल्यानंतर वडिलांइतकाच हिस्सा Joint Family च्या मिळकतीत प्राप्त करतो:-
वडील हे श्रेष्ठ नातेवाईक आणि Joint Family चे प्रमुख म्हणून मॅनेजर असतात व त्यांना Joint Family यांची मिळकत हस्तांतरित करण्याचा हक्क असतो. जेणेकरुन तो हिस्सा सज्ञान व अज्ञान सभासदांना प्राप्त होईल, परंतु सदरचे हस्तांतर हे कायदेशीर गरजेसाठी आणि मिळकतीच्या फायद्यासाठी किंवा जुने कर्ज देणेसाठी केले असेल तरच ते कायदेशीर होईल.
Joint Family च्या मिळकतीत वाटप करण्याचे असेल, त्यामध्ये अज्ञान सहदायाक असतील, वाटप हे तडजोडीच्या हुकूमनाम्याने झाले असेल, अज्ञानाला काही मिळकत दिली नसेल, आईकडील काकाने अज्ञानाचे काम म्हणून पाहिले त्याने फसवणूक केली असेल तर झालेले वाटप हे अज्ञानावर बंधनकारक नसेल.
वाटप एकमेकांमध्ये झाले नव्हते हे सर्वांना कबूल असेल, तसेच वाटपाचे वेळी मिळकती ही मोजून-मापून ते झाले नव्हते. दाव्यातील पक्षकार सहदायक हे आपल्या सोयीप्रमाणे जमीन वहीवाटीत असतील तर अशा परिस्थितीत त्यास कायदेशीर वाटप म्हणता येणार नाही.
Joint Family ची मिळकत असेल, त्यासंबंधी विक्रीखत झाले असेल, सदर मिळकतीबाबतीचा दावा हा शून्यकरणीय व निरर्थक रद्दबातल विक्रीखत ठरवून मागण्यासाठी केली असेल, वादीचे वडील आपल्या भावाबरोबर या मिळकतीचे वारस व आईबरोबर सामाईक मालकीने होते. वडिलांच्या हयातीमध्ये वादीला मिळकतीत काही हक्क नव्हता. वादीला त्याच्या वडिलांनी केलेल्या विक्रीखताबद्दल ते कायदेशीर गरजेसाठी नाही म्हणून आव्हान देता येणार नाही तसेच दाव्यात हुकूमनामा हा विक्रीबाबत झाला असेल तर ते अयोग्य असेल म्हणजेच शून्यकरणीय व निरर्थक रद्दबातल विक्रीखत असे ठरवून मागता येणार नाही.