हिंदू स्त्री ही मृत्यूपत्राविना मूलबाळ नसताना मयत झाली तर Rules Of Succession In Case Of A Female Hindu Died Intestate? हिंदू स्त्री हिला तिच्या आईकडून मिळकत वारसाने प्राप्त झाली तर ती मिळकत तीच्या बहीणीकडे हस्तांतरीत होते / तिच्या बहीणीला मिळकतीचा हक्क प्राप्त होतो म्हणजेच तिच्या वडिलांच्या कायदेशीर वारसाकडे जातो व ती मयत नवर्याच्या भावाकडे जात नाही . हिंदू स्त्रीला मर्यादित हक्क होता आणि तिला पुर्ण मालकी हक्क प्राप्त झाली ही गोष्ट अनावश्यक आहे . तिला वारसा ज्या मिळकतीचा मिळतो त्यावर तिचा स्त्रोत हा महत्त्वाचा असतो आणि त्यावरुनच परिस्थिती विनिमयतीत होते . वडिल हे मुलापासून मृत्यूच्या अगोदरच वेगळे झाले होते . त्यांची स्वतःची अशी वेगळी मिळकत होती . ती मिळकत ही मुलांच्या हातात मिताक्षरी मिळकत म्हणून येत नाही की जे पूर्वीच वेगळे झालेले होते तेव्हा प्रत्येक मुलाला ही मिळकत सामाईकात प्राप्त होते . कर्त्याने एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा वापर स्वतःच्या स्वतंत्र व्यवसायासाठी केला . कर्त्याने बाजारातून कर्ज काढून व्यवसाय सुरु केला . त्या व्यवसायात एकत्र कुटुंबाची गुंतवणूक नव्हती
We Make Law Easy For Everyone