घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर लागणारी कागदपत्रे
1)दापत्यांमध्ये दोघांपैकी कोणाकडुनही गैरक्रुत्य/गैरवागणुक घडल्यास पोलीस तक्रार केलेल्याची पोलीस स्टेशनची सही शिक्क्याची प्रत
2)वकीलांमार्फत नांदावयास जाण्यास/नांदावयस बोलवणेकामी लिगल नोटीस पाठवल्याची प्रत
3)पती पत्नी व त्यांचे नातेवाईकामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठरलेल्या अटी व शर्तीचा समजुतिचा करारनामा
4)काही कारणे नांदायला जायचे नसल्यास/नांदायला बोलवले तरी नांदायला येत नसल्यास वकीलांमार्फत घटस्फोट मिळणेसाठी पाठवलेली लिगल नोटीस
5)ईमेल /व्हाटस्प /एस.एम. एस द्वारे अभद्र पणे संभाषण/ लेखी स्वरुपात दिलेला धमकी मजकुराची कागदपत्र (सदर वेळी ईमेल अॅड्रेस/ ज्या मोबाईलवरुन व्हाटस्प /एस.एम. एस आला असेल त्याची संपुर्ण माहिती नमुद करणे)
6)जर दापत्यामध्ये दोघांपैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास शक्य असेल तर त्यांचे मेडिकल कागदपत्र
7)दापत्यामध्ये दोघांपैकी कोणालाही होत असलेल्या मानसिक /शारिरीक त्रासाबाबत शक्य असेल तर त्यांचे मेडिकल कागदपत्र
8)पत्नी/पती यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पहिल्या लग्नाविषयी लपवलेली माहीतीबाबत/फसवुन लग्न केल्याबाबत कागदोपत्री पुरावे
9)मुले असतील तर त्यांचा जन्माचा दाखला, त्याच्या दैंनदिन जीवनातील खर्चाच्या पावत्या उदा. अौषधोपचार, शाळा इत्यादीचा खर्चाच्या पावत्या
10)लग्नाच्या वेळी कपडेपत्ता (बस्ता), दागिने, लग्न कार्यालय, केटरिंग इत्यादीच्या खर्चाच्या पावत्या