Skip to main content

What does quick with child mean? / Quick Unborn Child / Corrosive-substance

गर्भस्त्राव घडवून आणणे, अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्यजन्माची लपवणूक करणे

What does quick with child mean? / Quick Unborn Child / Corrosive-substance
What does quick with child mean? / Quick Unborn Child / Corrosive-substance
*गर्भस्त्राव घडवून आणणे-

जो कोणी इच्छापूर्वक गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव घडवून आणील त्याला - जर असा गर्भस्त्राव त्या स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी सद्भावपूर्वक घडवून आणलेला नसेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि हीच स्त्री जर पोटात वाढलेले मूल असेल तर सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

- जी स्त्री स्वतःचा गर्भस्त्राव घडवून आणते ती या कलमाच्या अर्थकक्षेत येते.

*स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे-

जो कोणी गर्भस्त्राव घडवून आणणे या गुन्ह्यामध्ये वर्णन करण्यात आलेला अपराध त्या स्त्रीच्या, मग ती स्पंदित गर्भ असो अगर नसो, संमतीशिवाय करील त्याला, आजीव कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

*गर्भास्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे-

जर कोणी एखाद्या गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती केली व तिच्यामुळे अशा स्त्रीचा मृत्यू घडून आला तर त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कोणत्याही एक प्रकारचा कारावास होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

-ती कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असल्यास : तर त्याला एकतर आजीव कारावासाची किंवा वर नमूद केलेली शिक्षा होईल.

-या अपराधासाठी त्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे हे संभवनीय आहे याची अपराध्याला जाणीव असली पाहिजे अशी आवश्यकता नाही.

*मूल जिवंत जन्माल येण्यास प्रतिबंध करण्यास किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेली कृती-

- एखाद्या मुलाच्या जन्मापूर्वी, जो कोणी ते मूल जिवंत जन्मण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा त्याचे जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याचे उद्देशाने कोणतीही कृती करील आणि अशी कृती आईचा जीव वाचविण्यासाठी सद्भावपूर्वक केलेली नसेल तर, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतकी कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

*’सदोष मनुष्यवध' या सदरात मोडणाऱ्या कृतीव्दारे स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भ जीवाचा मृत्यू घडवून आणणे.-

- जर कोणी अशा परिस्थितीत एखादी कृती करील की, त्यामुळे जर तो मृत्यूस कारण झाला तर तो सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी होऊ शकेल, आणि या कृतीमुळे त्या स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भ जीवाचा मृत्यू घडून येतो तर त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एक प्रकारचा कारावासाची शिक्षा होईल, तसेच तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

- A यास माहीती आहे की आपण असे काम करतो की त्यात गर्भवती स्त्रीच्या मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे आणि त्यामुळे ती 'सदोष मनुष्यवध' सदरात येईल. त्यात त्या स्त्रीला इजा पोहोचते, पण तिचा मृत्यू होत नाही, परंतु तिच्या पोटातील स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यू घडून येतो. तर येथे A हा 'सदोष मनुष्यवध' या सदरात मोडणाऱ्या कृतीव्दारे स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भ जीवाचा मृत्यू घडवून आणणे' या गुन्ह्यातील अपराधास जबाबदार आहे.

*बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे-

- जो कोणी स्वतः बारा वर्षाखालील मुलाचा बाप किंवा आई असून तसेच स्वतःकडे अशा मुलाची देखभाल असून – अशा मुलाचा संपूर्णतः परित्याग करण्याचे उद्देशाने त्या मुलास कोणत्याही जागी उघड्यावर टाकील किंवा त्याला सोडून देईन तर त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

- याप्रमाणे उघड्यावर टाकल्याचा परिणाम म्हणून जर ते मूल मृत्यू पावले तर खुनाबद्दल किंवा प्रकरणपरत्वे, सदोष मनुष्यवधाबद्दल अपराधाची चौकशी होण्याला प्रतिबंध करण्यासाठी 'बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे' हे कलम योजलेले नाही.

*मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे-

- एखाद्या मुलाचा मृतदेह – मग ते मूल त्याचे जन्माच्या पूर्वी मेलेले असो अगर जन्मानंतर असो अगर जन्म होत असताना ते मेलेले असो ते गुप्तपणे पुरुन किंवा त्याची अन्यप्रकारे विल्हेवाट लावून जो कोणी अशा मुलाचा जन्म झाल्याचे उद्देशपूर्वक लपवून ठेवील किंवा लपविण्याचा प्रयत्न करील तर त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

दुखापतीविषयी

*दुखापत -

-जो कोणी एखाद्या व्यक्तीच्या ठायी शारीरिक वेदना, राग किंवा विकलता निर्माण करतो तो "दुखापत पोचवतो" असे म्हणतात. 

*जबर दुखापत -

-पुढील प्रकारच्या दुखापती याचा फक्त "जबर" म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत.-

*पुंस्त्वहरण

*कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे

*कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे

*कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे

*कोणत्याही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तीचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे

*मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रूप करणे

*हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे

*ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा व्यक्तीला वीस दिवस इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत

*इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे-

जर कोणी एखादी कृती केली असून ती योगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत व्हावी असा त्याचा उद्देश असेल किंवा ती योगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे अशी त्याला जाणीव असेल आणि त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचण्यास तो कारण झाला असेल, तर तो 'इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतो" असे म्हटले जाते.

*इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे-

जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतो त्याचा जी दुखापत करण्याचा उद्देश आहे किंवा जी दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे ती जर जबर दुखापत असेल अाणि तो ज्या दुखापतीस कारण होतो ती जबर दुखापत असेल तर, तो "इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवतो" असे म्हटले जाते.

-ज्याबाबतीत एखादा इसम जबर दुखापत पोहोचण्यास कारण झाला आहे आणि जबर दुखापत पोहोचवण्याचा त्याचा उद्देशही आहे किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे, याची त्याला जाणीवही आहे या दोन्ही गोष्टी असतील तेवढे खेरीजकरून एरवी, तो "इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवतो" असे म्हटले जात नाही. पण जर एका प्रकारची जबर दुखापत करण्याचा स्वतःचा उद्देश असताना किंवा तशी दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना प्रत्यक्षात त्याच्या हातून दुसऱ्या प्रकारची जबर दुखापत झाली असेल तर, तो "इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवतो" असे म्हटले जाते.

-X चा चेहरा कायमचा विद्रूप करण्याच्या उद्देशाने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना Y हा X ला ठोसा मारतो, त्यामुळे X चा चेहरा कायमचा विद्रुप होत नाही, पण त्याला वीस दिवस इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. Y ने इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवली आहे.

*इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा-

"प्रक्षोभ कारणामुळे इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतो" सदर गुन्ह्यातील या कलमाद्वारे उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवील त्याल, एक वर्षापर्यत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची , किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

*घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे-

"प्रक्षोभ कारणामुळे इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतो" सदर गुन्ह्यातील या कलमाद्वारे उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, गोळी घालण्याचे, भोसकण्याचे किंवा कापण्याचे कोणतेही साधन किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे तसे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा आग किंवा कोणताही तप्त पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणतेही विष किंवा कोणताही दाहक पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणत्याही स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने अथवा जो पदार्थ श्वासाबरोबर आत जाणे, गिळला जाणे किंवा रक्तात पोहोचणे हे मानवी शरीराला अपायकारक आहे अशा कोणत्याही पदार्थाच्या साहाय्याने अथवा कोणत्याही प्राण्याच्या साहाय्याने जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

*इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा -

"प्रक्षोभकारणामुळे इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे" सदर गुन्ह्यातील या कलमाद्वारे उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, जो कोणी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

*घातक हत्यारांची किंवा साधनांची इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे-

जो कोणी, "प्रक्षोभकारणामुळे इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे" सदर गुन्ह्यातील या कलमाद्वारे उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, गोळी घालण्याचे, भोसकण्याचे किंवा कापण्याचे कोणतेही साधन किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे असे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे असे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा आग किंवा कोणताही तप्त पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणतेही विष किंवा कोणताही दाहक पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणत्याही स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने अथवा जो श्वासाबरोबर आत जाणे, गिळला जाणे किंवा रक्तात पोहोचणे हे मानवी शरीराला अपायकारक आहे अशा कोणत्याही पदार्थाच्या साहाय्याने अथवा कोणत्याही प्राण्याच्या साहाय्याने इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवील त्याला, आजीव कारावासाची, किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

-*ॲसिड, इत्यादीचा वापर करून स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे-

जी कोणी व्यक्ती, इजा किंवा दुखापत करण्याच्या उद्देशाने किंवा घडून येण्याचा संभव असल्याची तिला जाणीव असताना, कोणत्याही व्यक्तीवर ॲसिड फेकून त्याव्दारे किंवा त्या व्यक्तीस ॲसिड पाजून, किंवा अन्य कोणत्याही साधनांचा वापर करुन त्याव्दारे त्या व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे किंवा भागांचे कायमस्वरुपी किंवा आंशिक नुकसान करील किंवा ते विद्रुप करील किंवा जाळील किंवा कुरुप करील किंवा विकलांग करील अथवा त्यास गंभीर दुखापत करील, ती व्यक्ती, दहा वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी आजीवन कारावासापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस, आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल :

परंतु, असा द्रव्यदंड, पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय उपचाराच्या खर्च भागविण्याइतपत उचित व वाजवी असेल :

परंतु आणखी असे की, या कलमान्वये लादलेला कोणताही द्रव्यदंड, पीडित व्यक्तीला देण्यात येईल.

-*स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे-

जी कोणी व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीस कायमस्वरुपी किंवा अंशतः नुकसान करण्याच्या किंवा विद्रुप करण्याच्या किंवा करण्याच्या किंवा जाळण्याच्या किंवा विकलांग करण्याच्या किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने त्या, व्यक्तीवर ॲसिड फेकील किंवा फेकण्याचा प्रयत्न करील किंवा कोणत्याही व्यक्तीस ॲसिड पाजण्याचा प्रयत्न करील किंवा अन्य कोणत्याही साधनांचा वापर करण्याचा प्रयत्न करील ती व्यक्ती, पाच वर्षांपेक्षा कमी नसेल; परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि द्रव्यदंडास देखील पात्र असेल.

-घातक हत्यारांची किंवा साधनांची इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे या गुन्ह्याच्या कलमाच्या व या कलमाच्या प्रयोजनार्थ, “ॲसिड" या शब्दप्रयोगात, जी व्रण करण्यास किंवा विद्रुपण करण्यास किंवा तात्पुरती किंवा कायमस्वरुपी विकलांगता करण्यास भाग पाडील अशी शारीरिक इजा करण्यास सक्षम आहे अशा ॲसिडिक किंवा क्षरणकारी गुणधर्म असलेल्या किंवा ज्वलनकारी स्वरुप असलेल्या कोणत्याही पदार्थाचा समावेश होतो.

 

Written by Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्