मालमत्ता वाटपातील विधवा स्त्रीयांचे अधिकार
![]() |
The Rights Of Widows In The Distribution Of Property |
सन १956 पुर्वी मुलीचे वडील मयत झाले असलेतील व The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व The Hindu Succession Act, १९५६ हे कायदे येण्यापुर्वी मुलगीला मर्यादीत मालकी (Limited Interest) हक्क मिळू शकत नाही.
तसेच The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 व हिंदू सक्सेशन ॲक्ट येण्यापुर्वी मुलाच्या विधवा बायकोला मिळकतीत हक्क प्राप्त होत नाही. मुलाच्या विधवेला प्रत्यक्ष मिळकत न मिळवता केवळ पोटगी मागण्याचा हक्क प्राप्त होतो.
तसेच एकत्र कुटुंबाची मिळकत होती व तिचे वाटप पुरुष सहदायकांमध्ये १९५२ साली म्हणजे The Hindu Succession Act, १९५६ हा कायदा येण्यापूर्वी झाले असेल तर अशा दावा मिळकतीतील प्रतिवादीच्या आईला त्या वेळी काही हक्क नसती. दावा मिळकतीचे वाटप हे The Hindu Succession Act, १९५६ हा कायदा येण्यापूर्वी व दावा दाखल करण्यापुर्वी वाटप झालेले असून सदर मिळकत ही पुरुष सहदायकांच्या पुर्ण ताब्यात असल्याने लग्न झालेल्या मुलींना तसेच लग्न झालेल्या मुलींना आईतर्फे दावा मिळकतीचे -घराचे The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्याप्रमाणे वाटप मागता येत नाही.
The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 च्या बाबत माहीती:-
कलम-3- दयाभाग स्कूलची व्यक्ती मिळकत ठेवून मयत झाल्यास किंवा इतर स्कूलप्रमाणे किंवा रुढीरीतीच्या कायद्याप्रमाणे मृत्युपत्र न करता मयत झाल्यास आणि त्याची स्वतंत्र मिळकत असेल तर त्याची विधवा पत्नी किंवा जर त्याला एकापेक्षा जास्त बायका असतील तर त्या सर्व विधवांना एकत्र मिळून कलम ३ ला धरुन मुलाइतकाच हिस्सा मयत व्यक्तीच्या मिळकतीमध्ये प्राप्त होईल. तसेच मयत मुलाची विधवा पत्नी हिलासुध्दा मुलाइतका हक्क प्राप्त होईल. तसेच ही तरतूद आवश्यक त्या बदलानुसार योग्य ते फेरफार करुन मयत मुलाच्या मयत मुलाच्या विधवेला लागू होईल.
कलम-4- जेव्हा हिंदू व्यक्ती हा दयाभाग स्कूलचा सोडून किंवा चालीरीतीचा कायदा सोडून इतर स्कूलचा असेल त्याचा हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क (हिस्सा) असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेस कलम ३ च्या तरतुदीच्या आधीन राहून तिला त्याच्या इतकाच हिस्सा प्राप्त होईल
कलम-५- या कायद्याप्रमाणे हिंदू विधवेला जो हिस्सा किंवा हक्क असेल त्यास "लिमिटेड इंटरेस्ट वुमेन राईट्स टू प्रॉपर्टी " (स्त्रीच्या मिळकतीवरील हक्क)असे संबोधले जाईल व तो मर्यादित असेल. परंतु तिला पुरुषाइतकाच वाटपाचा हक्क प्राप्त होईल.
कलम-6- वरिल कलमे ही कस्टमरी किंवा इतर वारसाचे नियम किंवा एकुलता एक वारस किंवा १९२५ च्या इंडियन सक्सेशन ॲक्टला लागू नाहीत.
कलम-7- The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 सदरील कायदा हा पूर्वी मयत झालेल्या हिंदू माणसाच्या मिळकतीला लागू नाही.
कलम-8- मयत हिंदू याने अमलात येऊ शकणारे मृत्युपत्र जर केले नसेल तर तो मयत झाला असल्यास The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 हा कायदा लागू होईल.
कमल-10- पुर्वीच्या कायद्याप्रमाणे जर हिंदू पुरुष मयत झाला तर मिताक्षर
कायद्याप्रमाणे त्याच्या मिळकतीचा वारसा, १९३७ पूर्वी खालीलप्रमाणे होता.
कलम-11- एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये विधवा स्त्रियांना व स्त्रियांना वाटपाचा किंवा इस्टेटीमध्ये हक्क नव्हता त्यांना फक्त पोटगीचा हक्क होता. १९३७ पूर्वी विधवा झालेली स्त्री असेल तर तिला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये पोटगीशिवाय कसलाही हक्क नव्हता व नाही व पोटगोचा हक्क त्या मिळकतीवर लागू होत असे.
“A” हिंदू ची स्वतंत्र मिळकत व अविभक्त सहदायकी मिळकत असेल व “A” हा १९३४ साली मयत झाला असेल व त्याला विधवा बायको “B” व “C” मुलगा असेल तर सन १९३७ सालाच्या आधीपारून “C” च्या हातात असलेल्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत विधवेला The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्यामधील कलम ३ व ४ प्रमाणे हक्क-हिस्सा मिळत नाही.
विधवेचा हक्क तिचा नवरा हिंदू वुमन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट, १९३७ लागू होणेपूर्वी मयत झाला असून नवरा मृत पावला त्यावेळी विधवेला १ मुलगा व मुलगी असेल तर तिचा मुलगा हा एकटाच सर्व मिळकतीचा पूर्ण मालक होतो. नवरा हा हिंदू वुमन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट, १९३७ हा कायदा येण्यापुर्वी म्हणेच १४/०४/१९३७ रोजीपुर्वी मृत झाल्यामुळे The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्यामधील कलम ३ प्रमाणे विधवेला काही हक्क प्राप्त होत नाहीत.
दावा मिळकतीबाबत कोर्टात वाद चालू असून सदरचा दावा हा कब्जाविषयी असेल व प्रतिवादी -विधवा जीचा नवरा हा अर्ध्या मिळकतीचा मालक होता तसेच विधवेचा नवरा हा १९३९ साली मृत पावला तेव्हा त्यावेळी त्याला मुलगा, नातू व पणतू नसतील तर The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्यामधील कलम ३ प्रमाणे विधवा ही त्याच्या इस्टेटीला वारस होईल. जेव्हा तो मयत झाला त्याचा हक्क-हिस्सा घरातील त्याच्या बायकोला मिळेल.
Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune