Skip to main content

What are the Property Rights/Share of an Adopted Child? in India

दत्तक मुलाला हक्क केव्हा येत नाही?

Property Rights Of An Adopted Child
Property Rights Of An Adopted Child 
The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्याच्या कलम १४ प्रमाणे विधवा स्त्रीची Limited Estate हिचे रुपांतर पूर्ण मालकीत झाले असून दि हिंदू सक्सेशन ॲक्ट, १९५६ अमंलबजावणीनंतर जर विधवा स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतल्यानंतर मिळालेल्या मिळकतीत कसलाही हक्क दत्तकास प्राप्त होत नाही.

The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 अमलात आल्यानंतर एकत्र कुटुंबातील जर एखादा सहवारसदार मयत झाला व दि हिंदू सक्सेशन ॲक्ट, १९५६ अमलात आल्यानंतर जर विधवा स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतला आणि एकत्र कुटुंब असेल आणि यांची एकत्रित मिळकत असेल तर दत्तक घेतलेल्या मुलाला कुटुंबाच्या मिळकतीत हक्क प्राप्त होतो.

कायदेमंडळाने सक्सेशन ॲक्टप्रमाने कलम १४ (1) दाखल करुन हिंदू स्त्री मिळकतीची पूर्ण मालक असल्याबाबत सांगितलेले आहे.

कोणत्याहि इस्टेटीचा वारसा हा अधांतरी किंवा तहकूब राहत नाही (Never in Abeyance) किंवा तात्पुरता स्थगित राहत नाही व एखादा माणूस मयत झाला तर त्याचा वारसा हा ताबडतोब (Suvivorship) उत्तरजीविता अगर (Succession) उत्तराधिकार अगर कायद्याने प्राप्त होणाऱ्या स्त्री वगैरे यांना प्राप्त होतो. The Hindu Women’s Rights to Property Act, १९३७ अमलात आल्या नंतर विधवा स्त्री असेल तर तिचा त्यातील मर्यादित हक्क सन १९५६ (Limited Share,1956) च्या कायद्याने पूर्ण मालकीत रुपांतरित होतो व ती पूर्ण मालक होते. त्यामुळे त्यानंतर तीने जरी दत्तक घेतला तरी त्या दत्तकाला काहीही हक्क प्राप्त होत नाहीत. अनेक लोकांची अशी समजूत आहे की, विधवा स्त्रीने दत्तक घेतलेल्या मुलास तिच्या इस्टेटीत सर्व हक्क प्राप्त होतात, पण हे खरे नाही. दत्तक हा इस्टेटीसाठी नसतो तर हिंदू शास्त्राप्रमाणे श्राध्द, होमहवन वगैरे करण्यासाठी दत्तक घेतला जातो.

हिंदू विधवा स्त्रीला तिच्या पतिच्या निधनानंतर मिळकत १९५६ नंतर प्राप्त झाली तरी ती पुर्ण मालक बनते व त्यानंतर विधवेने लग्न केले तर तिचा मिळकतीतील हक्क नष्ट होत नाही.

हिंदू सक्सेशन ॲक्ट कलम ६ ला अनुबंध (Proviso) हे अपवाद आहे. पुरुष जर मृत्युपत्र न करता मयत झाला असेल तर मुलगा, मुलगी, विधवा, आई, मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाची मुलगी, मयत मुलीचा मुलगा, मयत मुलीची मुलगी, मयत मुलाची विधवा पत्नी, मयत मुलाच्या मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाच्या मयत मुलाची मुलगी, मयत मुलाच्या मयत मुलाची विधवा पत्नी अशा बारा जणांना वारसाहक्क प्राप्त होतो व या मयत झालेल्या व्यक्तीने आपल्या पाठीमागे सदर बारा जणांपैकी क्लास १ शेड्युल मधील स्त्री वारस हक्कदार म्हणून ठेवली तर अशा परिस्थितीत को-पार्सनरीमधील मयत व्यक्तीचा हिस्सा हा मृत्युपत्राने अगर वारसाहक्काने (उत्तराधिकार-Succession ने) जातो व तो उत्तरजीविताने (Survivorship ने) जात नाही.

एकत्र कुटुंबाची Property

जर तीन भावडांनी वाटपत्र बनवून त्यातील मिककती या वडिलांच्या आहेत असे जाहिर करुन प्रत्येकाने १/३ हिस्सा जरी घेतला तरी जो पर्यंत सदर मिळकती या वडिलांच्या आहेत असा पुरावा त्या तीन भावडांकडे नसेल व अशा दावा मिळकती या मेहेरबान कोर्टात चॉलेन्ज झाल्या तर त्या वाटपपत्राने तिन्ही भावांना मालकी मिळकत नाही.

The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्याच्या कलम 11 प्रमाणे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये विधवा स्त्रियांना व स्त्रियांना वाटपाचा किंवा इस्टेटीमध्ये हक्क नव्हता त्यांना फक्त पोटगीचा हक्क होता. १९३७ पूर्वी विधवा झालेली स्त्री असेल तर तिला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये पोटगीशिवाय कसलाही हक्क नव्हता व नाही व पोटगोचा हक्क त्या मिळकतीवर लागू होत असे. तसेच पती दि.14/04/1937रोजी पुर्वी मयत झाल्यास The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 या कायद्याच्या कलम ३ प्रमाणे व The Hindu Succession Act, १९५६ या कायद्यच्या कलम १४ प्रमाणे, जरी एकत्र कुटुबांची मिळकत स्त्रीच्या कब्जात असली तरी तरी तीला ती पोटगी म्हणून खाण्यास दिली होती हे दाखवले नसेल तर तिला पूर्ण मालकी हक्क प्राप्त होत नाही.

The Hindu Succession Act, १९५६ या कायद्यच्या कलम 30 प्रमाणे हे स्पष्ट करते की भारतीय वारसा अधिनियम (Indian Succession Act of 1925) यानुसार विल किंवा इतर मृत्युपत्रांद्वारे विल्हेवाट लावण्यास सक्षम असलेल्या हिंदू वंशाची व्यक्ती ही कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकते. दावा ठरावाचा असेल व आईच्या मृत्युपत्राने वादीला दावा मिळकत मिळाली. वादीचे वडील १९५७ साली मयत झाली असेल तर आईला दावा मिळकतीत 1/2 हिस्सा येतो व वादीला मृत्युपत्राने फक्त आईचा हिस्सा मिळतो.

The Hindu Succession Act, १९५६ हा कायदा अमलात येण्यापूर्वी किंवा नंतर एखादी हिंदू स्त्रीच्या ताब्यात असलेली मर्यादीत मालकी (Limited Interest) मालमत्ताची पूर्ण मालक होते.

मुलाच्या विधवेस राहण्यास घर दिले तर ती मालक होते?

The Hindu Succession Act, १९५६ (कलम १४ [1])-वडिलांची स्वतःची मिळकत असेल व आईला पोटगीचा हक्क असेल व एक मुलगा मयत झाला असेल, तसेछ वडिलांनी मृत्युपत्राद्वारे मिळकती या दोन मुलांच्या नावे केली असेल व मुलाच्या विधवेने पोटगीचा दावा करुन त्यामध्ये हुकूमनामा झाल असून तिला राहण्यासाठी घर दिले गेले असेल व त्यानंतर मुलाचे विधवेचा मृत्यू झाला तर तिचा हिस्सा तिच्या मुलीला मिळतो व तो हिस्सा तिचा पूर्ण मालकीचा होतो.

एकत्र कुटुंबाची मिळकत असली तरी त्यामुळे ती मिळकत एखाद्या सहहिस्सेदाराने एकत्र कुटुंबासाठी विकत घेतली अशी संभावना त्यातून निघत नाही. ही मिळकत एकत्र कुटुंबाची आहे असे जो कथन करेल, त्यावर ते शाबित करण्याची जबाबदारी येते.

Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्