Skip to main content

Partition of Property Among Family Members in Percentage In India

नवीन कायदे- हिंदु वारसा कायद्यात झालेली दुरुस्ती 

Partition of Property in Hindu Undivided Family (मालमत्तेचे विभाजन)
Partition of Property in Hindu Undivided Family (मालमत्तेचे विभाजन)
हिंदु वारसा कायद्यामध्ये दि.२२/6/1994 रोजी महाराष्ट्रात दुरुस्ती होऊन मुलींना हक्क (Survivorship) उत्तरजीवितेने दिले गेले. तसेच केद्र सरकारने सन २००५ पासून हिंदु वारसा कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश करुन त्यात मुलींना मुलांइतकाच हिस्सा दिला आहे. मिताक्षरमध्ये सहवारसदार म्हणून मिळकतीमध्ये हक्क असेल तर त्याचा हिस्सा हा (Survivorship) उत्तरजीवितेने त्याच्या वारसाकडे जातो. परंतु जर मयत याचा स्त्री नातेवाईक क्लास 1 शेड्युलमधील जिवंत असेल किंवा पुरुष नातेवाईक ह्या वर्गातील स्त्री पासून हक्क सांगणारा असेल तर Joint Family मधील सर्व मिळकतीतील हिस्सा हा जर कोणत्याही मृत्युपत्र (Will) द्वारे नियोजित केला गेला नसेल तर त्याचा हिस्सा (Succession) उत्तराधिकार या कायद्याप्रमाणे मिळते व तो हिस्सा (Survivorship) उत्तरजीवित्वाने प्राप्त होत नाही.

Hindu Succession Act मधील सुधारीत कलमाप्रमाणे स्त्रीला व मुलीला प्रथमच Joint Hindu Family च्या म्हणजेच coparcenary Property मध्ये हक्क-Right दिले गेले असून मुलींना प्रथम हक्क प्राप्त झाले व तसेच मुलगा, मुलगी, विधवा, आई वगैरे यांना हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील प्राप्त होणाऱ्या हिश्शात त्यांनाही (Succession) उत्तराधिाकाराने हिस्सा प्राप्त होतो. सदर सुधारित कायद्याने प्रथमच स्त्रियांना आणि मुलींना Estate यामध्ये हक्क प्राप्त झालेला आहे व Partition-वाटपाच्या वेळी त्यांना तो हक्क प्राप्त झालेला आहे.

पुरुष जर मृत्युपत्र न करता मयत झाला असेल तर मुलगा, मुलगी, विधवा, आई, मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाची मुलगी, मयत मुलीचा मुलगा, मयत मुलीची मुलगी, मयत मुलाची विधवा पत्नी, मयत मुलाच्या मयत मुलाचा मुलगा, मयत मुलाच्या मयत मुलाची मुलगी, मयत मुलाच्या मयत मुलाची विधवा पत्नी अशा बारा जणांना वारसाहक्क प्राप्त होतो व सदर बारा जणांपैकी कोणी जिवंत असेल तर हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे वाटप केले जाते व त्याप्रमाणे हक्क ठरवले जातात व त्याप्रमाणे हिस्से काढले जातात.

उदा. “A” हा Joint family मधील पुरुष हा १९६० साली मयत झाला असेल तर एक मुलगा, एक पत्नी आणि एक मुलगी असे मयत पुरुषास वारस असतील तर

जो मयत झाल त्याचा हिस्सा काढावा लागतो म्हणजेच “A” चा हक्क वेगळा काढावा लागतो.

मुलाला कोपार्सनरी उत्तरजीविता म्हणून मालमत्तेत जन्मतः हक्क असतो म्हणून त्याचा एक हिस्सा काढला जातो.

विधवा स्त्रीला म्हणजेच बायकोला मुलाइतकाच हक्क वाटपाच्या वेळी प्राप्त होतो.

म्हणून वडिलांचा हिस्सा १/, मुलाचा हिस्सा १/३ आणि विधवा बायकोचा हिस्सा 1/३ असा काढला जात होत होता.

विधवा स्त्रीला दिलेला हक्क हा कायद्याने दिलेला हक्क आहे, तो तिला मिळतो.

मतय “A” ला १/३ हिस्सा असतो व त्याला पत्नी, मुलगी व मुलगा हे वारस आहेत म्हणून या ठिकाणी त्याचा जो १/३ हिस्सा असेल, त्याचे पुन्हा तीन हिस्से कायद्याने काढले जात होते. “A” च्या विधवा पत्नीचा १/+ /9 = 4/9 हिस्सा व मुलाचा १/+ /9 = 4/9 हिस्सा व मुलीचा 1/9 हिस्सा असे वाटप होत होते.

परंतु सध्याच्या सुधारित कायद्याप्रमाणे मिळकतीचे वाटप केले जाते-

परंतू सन 2005 मध्ये Central Government ने Hindu Succession Act मध्ये दुरुस्ती करुन मुलींना मुलाइतकाच हक्क Joint Family च्या मिळकतीत दिलेला आहे. त्यामध्ये कोपार्सनर मुलाला तिच्या जन्मापासून (मिताक्षर) मिळकतीमध्ये सहवारसदार मानले गेलेले आहे आणि तिला तिचा स्वतःचा हक्क म्हणून मुलाइतकाच हक्क दिला गेला आहे. जणू काही ती मुलगाच आहे असे समजून तिला उत्तराधिकाराचा (Survivorship चा) हक्क दिला गेला आहे. वाटपाच्या वेळी Joint Family Property मध्ये मुलाला जेवढा हक्क प्राप्त होइल तेवढाच हक्क मुलीला मिळेल.

मयत पुरुषाचे मिळकतीचे वारसामधील वाटप 

How is Property Distributed

तसेच मुलीना मिळणारा हक्क हा मालकी हक्काने कोपार्सनरी मिळणार असून तो हक्क मृत्युपत्रानेही देता येईल.

वरील दुरुस्ती ही दि.22/6/1994 पुर्वी ज्या मुलींची लग्ने झाली आहेत त्यांना लागू नाही. तसेच या दुरुस्तीपुर्वी जे काही वाटप झाले असेल त्यालाहि तो कायदा लागू नाही.

विधवेला विक्रिसंबंधी आव्हान देता येईल का? व केव्हा?

उत्तर:- होय. विधवेला विक्रिसंबंधी आव्हान देता येईल.

* “A” मिताक्षर स्कूलने शासित असलेला पुरुष हा The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 अमलात आल्यानंतर मयत झाल असेल तर व

* The Hindu Succession Act, १९५६ च्या पुर्वी मयत झाला असेल तर आणि

* त्याला एक विधवा बायको, एक मुलगा असेल तर ते दोघे वारस होतात व

* मुलाने एकत्र कुटुंबाची मिळकत १९६२ साली विकली तर

विधवा स्त्रीला त्या विक्रीला आव्हान देता येते.

सन १९३७ पुर्वीच्या विधवा स्त्रीला मिळकतीत The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 The Hindu Succession Act, १९५६ कायद्याप्रमाणे वारसा येईल का?

उत्तर :- नाही.

पती सन १९३० साली मयत झाल म्हणजे The Hindu Women’s Rights to Property Act, 1937 The Hindu Succession Act, १९५६ हे कायदे येण्यापुर्वी मयत झाला असेल तर सदरच्या कायद्याप्रमाणे विधवेला पतीच्या मिळकतीत कसलाही हक्क प्राप्त होत नाही म्हणजेच तिला पुर्ण मालकी किंवा निरपवाद किंवा अबाधित हक्क प्राप्त होत नाहीत.

तसेच The Hindu Succession Act, १९५६ हा कायदा येण्यापुर्वी विधवेने कुटुंबाची मिळकत विकली तर खरेदीदाराने केलेले खरेदीपत्र हे रद्दबादल ठरते. कारण तिला फक्त लिमिटेड इंटरेस्ट (Limited Interest) त्या काळी होता. तिच्या मृत्यूनंतर ती मिळकत प्रत्यावर्ती (Reversioness) कडे जाते.

स्त्रीच्या नावावर मिळकत असेल तर ती Joint Family Property होत नाही व तशी धारणा नाही.

विधवा ही कर्ता होऊ शकत नाही.

आई ही सहदायक नाही म्हणून ती केव्हाही एकत्र कुटुंबाची कर्ता होऊ शकत नाही.

 Written by Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्