Skip to main content

How to Make Partition of Property Among Family Members?

संपत्ती-वाटपाबद्दल माहीती

Family Property Partition In India
Family Property Partition In India
सर्वसाधारण वाटपासंबंधी कल्पना अशी आहे की, मिळकतीचे सरसनिरस मानाने तुकडे पाडून वाटप करणे. सर्वसाधारण समाजात स्थावर मिळकतीचे वाटप केले जाते व जंगम मिळकतीत ज्याचे त्याला मिळकतीत प्रत्यक्षात देणे यालाही वाटप म्हटले जाते. प्रत्यक्ष वाटप हा भाग कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा असतो व दिवाणी व्यवहारसंहितेप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी शेतजमिनीविषयक कायद्याचे अधीन राहून दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यास अनुसरुन केले जाते. इतर घरे-दारे, पडीक जागा किंवा जंगम मिळकत यांचे वाटप कोर्टकमिशनरमार्फत केले जाते.

वास्तविक, हिंदू कायद्याप्रमाणे फक्त सरस-निरस मानाने तुकडे पाडणे, स्वतंत्र मिळकत विभक्त करणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही; तर तो हिस्सा किती येतो हे पाहण्याचे महत्त्वाचे काम असते. त्यासाठी हिंदू एकत्र कुटुंबात नक्की वारस कोण आहेत व त्यांचा हिस्सा नक्की किती आहे, कोणती मिळकत एकत्र कुटुंबाची आहे, कोणते हस्तांतर कायद्याला धरुन आहे व सरस-निरसपणा हा निश्चित कायद्याप्रमाणे ठरविला जावा म्हणून कोर्ट वाटप केले जाते.

वास्तविक, कायद्याप्रमाणे वरील गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घरगुती किंवा तोंडी वाटप करता येते. त्यात बेकायदेशीर काही नाही. परंतु हिंदु कायद्याप्रमाणे समज असा आहे की, जेव्हा सहदायक ह्याचा हेतू कुटुंबापासून विभक्त होण्याचा असतो तेव्हा ते वाटप झाले असे समजले जाते. एकत्र कुटुंबामध्ये तोंडी वाटपाने मिळकत वेगळी हिश्शावरून ठरवली जाते. थोडक्यात, सभासदांच्या हेतूवरून वाटप झाले किंवा नाही, हे पाहिले जाते.

तसेच हिंदू कायदा हा हिंदू, जैन, शीख आणि बौध्द यांना लागू आहे. म्हणजे हिंदूंचा कोणताही धर्म असो, त्या हिंदू धर्माप्रमाणे असणाऱ्या व्यक्तीस वीरशैव, लिंगायत व ब्राम्हो, प्रार्थना आणि आर्य समाज यांना हिंदू कायदा लागू आहे. तसेच जे कोणी पुरुष बौध्द, जैन किंवा शीख या धर्माचे आहेत त्यांना हा कायदा लागू होतो. परंतु मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू धर्माचे आहेत, त्यांना हा कायदा लागू होत नाही.

Hindu Succession Act, 1956 हा अधिनियम खालीदिलेल्या व्यक्तींना लागू आहे :-

1) जी व्यक्ती धर्माने त्याचे कोणतेही रुप किंवा विकसन यानुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती- वीरशैव, लिंगायत अथवा ब्राम्हो समाजाचा, प्रार्थनासमाजाचा किंवा आर्य समाजाचा अनुयायी यांसुध्द-

2) धर्माने बौध्द, जैन किंवा शीख आहे अशी व्यक्ती आणि

3) जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाही अशी अन्य कोणतीही व्यक्ती.

वडिल किंवा आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून जी मिळकत वारसाने येते ती मिळकत वडिलोपार्जित संबोधली जाते अशा मिळकतीस अप्रतिबंधदाय वारसा मिळकत (Under Mitakshara law, coparcenary Property-Unobstructed Heritage) असे म्हणतात. अशा मिळकतीचे वाटप केले जाते ; परंतु जी मिळकत नातेवाईककांकडून, प्राप्त होते ती मिळकत वाडवडिलार्जित मालमत्ता म्हणुन धरली जात नाही अशा मिळकतीस वारसास बाधा येणारी मिळकत (Under Mitakshara law, coparcenary Property-Unobstructed Heritage) असे म्हणतात.

जर पुरुष हा ancestral property चा हक्कधार होत असेल तर त्याच्या मुलाच्या मुलाला आणि पणतूला जन्मतः किंवा दत्तक घेतल्यापासून त्याचा हिस्सा मिळतो. पूर्वी वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे पार्टिशन वरिलप्रमाने होत असे. सहदायिकी (coparcenary) यांचेमध्ये फक्त पुरुषच सहदायिक(coparcener) असत. अलिकडे सहदायिकाचा हक्क (Coparcenary Rights) दुरुस्ती कायद्याने (The 2005 Amendment to the Hindu Succession Act 1956) मुलींनाही दिला आहे.

स्वतः किंवा एकट्याच्या मालकीची जी Property असेल, तिचे पार्टिशन व्यक्ती जिवंत असताना होत नाही; परंतू वडिलोपार्जित Property असेल तर तीचे पार्टिशन-वाटप करता येते.

Hindu Undivided Family ही कोर्पार्सनरिपेक्षा मोठी संस्था आहे. सर्व कोर्पार्सनर हे एकत्र कुटुंबाचे घटक असतात. परंतु आणखी इतरही Undivided Family चे घटक हे एकत्र कुटुंबात असतात. उदा. लग्न न झालेल्या कोर्पार्सनरांच्या मुली आणि जे कोर्पार्सनर नाहीत असे सभासद Undivided Family – जॉईंट फॅमिली मध्ये असतात. कोर्पार्सनरी एकत्र कुटुंब ही लहान संस्था आहे व एकत्र कुटुंब ही संस्थाही पिढ्यान -पिढ्या चालत येते. त्यामध्ये आई, पत्नी, भावाची पत्नी, मुले-मुली या सर्वांचा अंतर्भाव होतो व त्यांना मिळकत असते किंवा नसते व ते लोक स्वतंत्र मिळकत मिळवतात. तेव्हा एकत्र कुटुंब ही सर्वांची मिळून संस्था आहे. त्यात सर्वजण मिळून समाविष्ट असतात व कोर्पार्सनरमध्ये वर लिहल्याप्रमाणे ठराविक पुरुष त्याचे सभासद असतात व त्यांनाच वाटपात हक्क प्राप्त होतो व कायद्याने वारस ठरलेले आहेत त्यांनाच हक्क मिळतो.

Written By Adv. Sarika Khude

Rajgurunagar, Pune 

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावे...

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात ...

Affidavit Of Assets and Liabilities

कोर्टामध्ये कोणत्याही पोटगीच्या अर्जाबरोबर अर्जदार व जाबदेणार यांना  मालमत्ता आणि देयकाचे /गैरकृषी अवधारणेसाठी मालत्ता आणि जबाबदारी यांचे प्रतिज्ञापत्र/Affidavit Of Assets and Liabilities दाखल करावेच लागते. सदर   प्रतिज्ञापत्रामध्ये खालीलप्रमाणे माहीती देणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 11 के    जर जोडीदार अथवा गैर अर्जदार भारतीय नसल्यास अथवा भारतीय नागरीक नसल्यास, भारताबाहेरील नागरीक असल्यास, नागरीकत्व, राष्ट्रीयत्व सदर निवासस्थानाचा तपशिल --    अर्जदार किंवा इतर जोडीदार तात्पुरते किंवा कायमचे बाहेर परदेशात वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरीकत्व, राष्ट्रीयत्व, सदर निवासस्थानाचा तपशील     --    असे अर्जदार/जोडीदाराचे नोकरीचे परकीय चलन सध्याची नोकरी चालु/ताज्या उत्पन्नाचा तपशिल अशा परदेशी नियोक्ता किंवा परदेशी संस्थाकडुन नोकरीचे पत्राव्दारे किंवा परदेशी नियोक्ता किंवा विदेशी संस्थाकडुन प्रशंसापत्र किंवा संबंधीत वित्तीय संस्थेचे उतारे     --    परदेशी कार्यक्षेत्रात अशा अर्जदार/जोडीदाराच्या घर...