Skip to main content

For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments

For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments

For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments
For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments
 

केंद्र व महाराष्ट्र सरकारने केलेली दुरुस्ती- मुलींचे मिळकतीमधील हक्क

वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट, १९३७ च्या पूर्वी स्त्रीला व मुलींना वाटपात हक्क नव्हता किंवा हिंदू एकत्र कुटुंबाची जी मिळकत आहे त्यात त्यांना हक्क नव्हता. १९३७ साली दि. वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट हा कायदा आला व त्यामध्ये जर वाटप झाले तर विधवा स्त्रीला हक्क प्राप्त झाला. त्यानंतर दि.17/06/1956 रोजीच्या हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे प्रथमच आई, मुलगी यांना वाटपात हक्क दिले गेले तसेच विधवेस मुलाइतका हक्क नवऱ्याच्या मिळकतीत प्राप्त होतो व मुलीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतित जो काही वडिलांचा हिस्सा निघेल त्या हिश्शामध्ये वारसाप्रमाणे वाटप करुन जो काही हिस्सा येतो तो काढता येतो व तो तिला प्राप्त होतो.

दि. 22/06/1994 रोजी हिंदू वारसा (महाराष्ट्र दुरुस्ती) कायद्याप्रमाणे मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकेच हक्क प्राप्त झाले आहेत व दि. 22/06/1994 रोजी नंतर ज्यांची लग्ने झालेली आहेत व ज्या मुली अविवाहित आहेत त्यांना मात्र 1994 साली सुचविलेल्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकाच हक्क प्राप्त होतो. उदा. एका कुटुंबामध्ये जर वडील, त्यांची पत्नी, एक मुलगा, दि. 22/06/1994 रोजी नंतर विवाहीत झालेली एक मुलगी व अविवाहीत मुलगी असे असतील व वडिलांचा मृत्यू हा दि. 22/06/1994 रोजी नंतर झाला असेल तर त्याच्या पत्नीस, मुलाला व 1994 नंतर लग्न झालेल्या मुलीला तसेच अविवाहीत मुलीला मुलाइतकाच हिस्सा प्राप्त होतो. म्हणजेच अशा परिस्थितीत प्रत्येकाला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सारखा हिस्सा प्राप्त होतो व मुलगी जन्मतःच कोपार्सनर होते. परंतु दि. 22/06/1994 रोजी हा कायदा अमलात येण्यापुर्वी ज्या मुलींची लग्ने झाली असतील त्या मुलींना मुलाइतका जन्मतः वारसाहक्क येत नाही.

सक्सेशन बाय सर्व्हायशिप - उत्तराधिकार हे उत्तरजीवित्वा तर्फे:

A)दिनांक २२/०६/१९९४ रोजी अमलात आलेल्या दि हिंदू सक्सेशन महाराष्ट्र ॲमेंडमेंट ॲक्ट मधील मुलींना मिळकतीमध्ये हक्क प्राप्त होण्याबाबत तरतुदी खालील प्रमाणे-

) मिताक्षरी कायद्याने नियंत्रित केल्या जाणाऱ्या संयुक्त हिंदू कुटुंबामध्ये, सहदायकाची कन्या ज्या रीतीने पुत्र सहदायिक होतो त्याच रीतीने, जन्मापासून तिच्या स्वतःच्या हक्कामुळे सहदायाद होईल आणि तिला ती पुत्र असती तर उत्तरजीवित्वाच्या-Survivorship तत्त्वानुसार दावा सांगण्याच्या अधिकारासह जे अधिकार मिळाले असते ते अधिकार सहदायकी संमत्तीमध्ये असतील, आणि ती त्यांच्या संबंधात पुत्र म्हणून जी दायित्वे व निःसमर्थता असतात ती दायित्वे व निःसमर्थता यांना अधीन असेल;

) खंड () मध्ये निर्देशिलेल्या संयुक्त हिंदू कुटुंबातील वाटणीच्या वेळी सहदायकी संपत्तीची वाटणी अशा प्रकारे करण्यात येईल की, पुत्राला वाटून देण्यायोग्य असेल तेवढाच हिस्सा कन्येला वाटून देण्यात येईल:

परंतु, पूर्वमृत पुत्र किंवा पूर्वमृत कन्या वाटणीच्या वेळी हयात असता किंवा असती तर त्याला किंवा तिला वाटणीच्या वेळी तो हिस्सा मिळाला असता तो हिस्सा अशा पूर्वमृत पुत्राच्या किंवा अशा पूर्वमृत कन्येच्या हयात अपत्याला वाटून देण्यात येईल.

परंतु असे की, पूर्वमृत पुत्राचे किंवा पूर्वमृत कन्येचे पूर्वमृत अपत्य वाटणीच्या वेळी हयात असते तर अशा अपत्याला वाटून देण्यायोग्य असा हिस्सा प्रकरणपरत्वे पूर्वमृत पुत्राच्या किंवा पूर्वमृत कन्येच्या अशा पूर्वमृत अपत्याच्या अपत्याला वाटून देण्यात येईल;

) खंट () च्या तरतुदींच्या आधारे हिंदू स्त्री ज्या कोणत्याही संपत्तीस हक्कदार होते ती संपत्ती ती स्त्री सहदायकी मालकी तत्त्वाच्या आनुषंगिकांसह धारण करील आणि ती संपत्ती, या अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, तिच्याकडून मृत्युपत्राव्दारे किंवा मृत्युपत्रानुसार अन्य व्यवस्था करुन विल्हेवाट करण्यायोगी असल्याचे मानण्यात येईल;

)सदर कायद्यात सामिल असलेल्या तरतूदी या सदर कायद्याच्या अमल बजावनीच्या दिनांकाआधी लग्न झालेल्या Daugther ला लागू पडणार नाही;

) हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम याच्या अमल बजावनीच्या तारखेआधी अमलात आलेल्या पार्टिशनला खंड () मधील कोणतीही तरतूद लागू असणार नाही.

B)After death उत्तरजीवी (Survivorship) ने प्रकांत होणारे अधिकार त्याबाबत तरतुदी खालील प्रमाणे:

मूत्युसमयी वरील तरतुदींच्या आधारे मिताक्षरा सहदायकी संपत्तीत हितसंबंध असलेली एखादी हिंदू स्त्रि- हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, 1994 च्या प्रारंभाच्या तारखेनंतर मृत्यू पावली तर त्या संपत्तीतील तीचा हितसंबंध उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार सहादायकितील उत्तरजीवी (Survivorship) सदस्यांकडे प्रकांत होईल; या अधिनियमानुुसार नव्हे.

परंतु, मृत व्यक्तीच्या मागे कोणतेही अपत्य किंवा पूर्वमृत अपत्याचे अपत्य हयात असेल तर मिताक्षरा सहदायकी संपत्तीमधील मृताचा हितसंबंध या अधिनियमाखाली प्रकरणपरत्वे मृत्युपत्रीय किंवा अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार (Succession) हक्क प्राप्त होईल, उत्तरजीवित्वाच्या (Survivorship) तत्त्वानुसार नव्हे.

Preferential right to acquire property in specific cases:

) जेथे, हिंदू उत्तराधिकारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, 1994 याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर, मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीच्या कोणत्याहि स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तीने मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत असो चालवलेल्या कोणत्याही धंद्यातील हितसंबंध वरील A B मध्ये नमुद केलेल्या तरतुदीं खाली दोन किंवा अधिक वारसदारांना प्राप्त होईल, आणि अशा वारसदारांपैकी कोणाही एकाने संपत्तीतील किंवा धंद्यातील त्याचा किंवा तीचा हितसंबंध हस्तांतरित करावयाचे योजल्यास, हस्तांतरणासाठी योजलेला हितसंबंध संपादन करण्याचा अन्य वारसदारांना Preferential right-अधिमानी अधिकार असेल.

) मृताच्या Property तील कोणताही हितसंबंध कोणत्या In exchange for a reward या section खाली transfer करता येईल, ते पक्षांमधील कोणत्याही Lack of Agreement, न्यायालयाकडे त्याबाबत अर्ज करण्यात आल्यावर त्याच्याकडून निर्धारित केले जाईल, आणि जर तो हितसंबंध संपादन करण्याचे योजणारी कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे निर्धारित केलेल्या प्रतिफलाच्या बदल्यात तो संपादन करण्यास राजी नसेल, तर अशी व्यक्ती अर्जाचा किंवा त्यास आनुषंगिक असलेला सर्व खर्च देण्यास दायी असेल.

Specific assumptions will be revoked (वरिल तरतुदीनुसार नसलेल्या वाटण्या रद्दबादल असतील)

मुख्य अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, दिनांक22/06/1994रोजी किंवा त्यानंतर आणि हा अधिनियम राजपत्रात प्रसिध्द होण्याच्या दिनांकापूर्वी संयुक्त हिंदू कुटुंबाच्या (joint Hindu family) सहदायकी संपत्तीच्या संबंधात, कोणतीही वाटणी करण्यात आली असेल आणि अशी वाटणी, या अधिनियमाव्दारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदीनुसार नसेल, त्या बाबतीत अशी वाटणी रद्दबादल असल्याचे व ती नेहमी तशी असल्याचे मानण्यात येईल.

Amendments made to the girl's inheritance (केंद्र सरकारची 2005 ला मुलीच्या वारसासंबंधी करण्यात आलेली दुरुस्ती)

कलम6 -सहदायाता मालमत्तेमधील हितसंबंधाची हक्क प्राप्ती

)हिंदू वारसा (सुधारणा) अधिनियम, 2005 अंमलात आल्यावर व तेव्हापासून, मिताक्षर कायद्याने शासित केलेल्या हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये, सहदायादायी कन्या ही,-

1)जन्माव्दारे पुत्राचे ज्या रीतीने हक्क असतात त्याच रितीने तिच्या स्वतःच्या हक्कामध्ये जन्माव्दारे सहदायाक होईल;

2)जर ती पुत्र राहीली असती तर, तिला जे हक्क मिळाले असते तेच हक्क तिला सहदायादता मालमत्तेमध्ये (coparcenary property) असतील;

3)Son म्हणून उक्त coparcenary स्थावर मालमत्ते बाबतीत ज्या Responsibilities असतील त्या Responsibilities सह त्याचा विषय असेल आणि हिंदू मिताक्षर सहदायदाचा कोणाताही संदर्भ हा, सहदायदाच्या कन्येचा संदर्भ असल्याचे समजण्यात येईल:

परंतु दि.20/6/2004 पूर्वी जी वाटणी घडून आली असेल त्या मालमत्तेच्या कोणत्याही वाटणीस किंवा मृत्यूपत्रीय विनियोगासह कोणत्याही विनियोगास किंवा अन्यसंक्रमणास, या पोट-कलमाप्रमाणे अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे बाध येणार नाही किंवा ती अवैध ठरणार नाही.

) पोट कलम अ च्या आधारे जिच्या बाबतीत, एखादी हिंदू स्त्री हक्कदार झाली असती अशी कोणतीही मालमत्ता, सहदायदाता मालकी हक्काच्या घटनांसह तिच्याकडून धारण करण्यात येईल आणि या अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशी मालमत्ता ही, मृत्यूपत्रीय विनियोगाव्दारे तिच्याकडुन विनियोग करण्यायोग्य मालमत्ता असल्याचे मानण्यात येईल.

)जेव्हा हिंदू वारसा (सुधारणा) अधिनियम, २००५ अंमलात आल्यानंतर एखादी हिंदू व्यक्ती मृत होईल त्याबाबतीत, मिताक्षर कायद्याने शासित केलेल्या हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालमत्तेमधील तिचा हितसंबंध, मात्र उत्तरजिवित्वाव्दारे (Survivorship) नव्हे तर, या अधिनियमान्वये अमृत्युपत्रीय, किंवा यथास्थित विनामृत्युपत्रीय वारसाहक्काव्दारे हक्क प्राप्त होईल, आणि जणू काही तिची वाटणी करण्यात आली आहे असे समजून सहदायदाता मालमत्ता विभागण्यात आली असल्याचे समजण्यात येईल आणि-

1) पुत्रास जेवढा हिस्सा (वाटा) वाटप करण्यात येईल तेवढा हिस्सा कन्येला देखील वाटप करण्यात येईल.

2) पूर्वमृत पुत्र किंवा पूर्वमृत कन्या, वाटणीच्या वेळी ते जिवंत असताना, त्याला (पुत्र) किंवा तिला (कन्या) जेवढा हिस्सा मिळाला असता तेवढाच हिस्सा पूर्वमृत पुत्राचा किंवा पूर्वमृत कन्येचा हिस्सा, अशा पूर्वमृत पुत्राच्या किंवा कन्येच्या उत्तरजीवित मुलास वाटप करण्यात येईल, आणि

3)पूर्वमृत पुत्राचे किंवा पूर्वमृत कन्येचे पूर्वमृत मूल, वाटणीच्या वेळी जिवंत असताना, त्याला (मुल) किंवा तिला (मुलगी) जेवढा हिस्सा मिळाला असता तेवढा पूर्वमृत पुत्राच्या किंवा पूर्वमृत कन्येच्या पूर्वमृत मुलांचा हिस्सा, पूर्वमृत पुत्राच्या किंवा यथास्थिति, पूर्वमृत कन्येच्या पूर्वमृत मुलाच्या मुलास वाटप करण्यात येईल.

)हिंदू वारसा (सुधारणा) अधिनियम, 2005 अंमलात आल्यानंतर, कोणतेही न्यायालय, त्याच्या वडिलांनी, अजोबांनी, पणजोबांनी घेतलेल्या कोणत्याही थकित ऋणाची वसुली करण्यासाठी असे ऋण फेडण्याच्या त्याच्या पुत्राच्या, नातवाच्या, पणतूच्या हिंदू कायद्यानुसार असलेल्या धार्मिक उत्तरदायित्वाच्या कारणावरुनच केवळ अशा पुत्राच्या, नातवाच्या, पणतूच्या विरुध्द खटला दाखल करण्याच्या कोणत्याहि अधिकारास अधिमान्यता देणार नाही.

परंतु , सदर कायदा अमलात येण्यापुर्वी, संविदाकृत केलेल्या कोणत्याही ऋणाच्या बाबतीत, वरिल पोट कमलामध्ये समावेश असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे-

1)पुत्र, नातू किंवा यथास्थिती, पनतू यांच्याविरुध्द खटला दाखल करण्याच्या कोणत्याही धनकोच्या अधिकारास; किंवा

2)अशा कोणत्याही ऋणाच्या बाबतीत किंवा त्याची परतफेड करण्यासाठी केलेल्या कोणत्याहि अन्य संक्रमणास बाधा येणार नाही आणि अशा कोणताही अधिकार किंवा अन्यसंक्रमण हे, जणू काही हिंदू वारसा सुधारणा अधिनियम 2005 अमलात आला नव्हता असे समजून ते ज्या रितीने व ज्या मर्यादेत अमल बजावणी योग्य झाले असते ते त्याच रितीने व त्याच मर्यादेत आर्थिक उत्तरदायित्वाच्या नियमांन्वये अमलात असतील. (सन 2005 अमलात येण्यापुर्वी ज्याचा जन्म झाला होता किंवा ज्याला दत्तक घेण्यात आले होते अशा पुत्राचा, नातवाचा किंवा पणतूचा संदर्भ असल्याचे मानण्यात येईल.)

)या कलमात सामिल असलेल्या तरतुदी या दि.20/12/2004 रोजीच्या आधी अमलात आली असेल अशा वाटपासाठी लागू नाही. (वाटणी - नोंदणी अधिनियम १९०८ या अन्वये रितसर नोंदणी केलेल्या वाटपपत्राचे निष्पादन करुन केलेली कोणतीही वाटणी किंवा एखाद्या न्यायालयाच्या हुकूमनाम्याव्दारे अमलात आणण्यात असली पाहीजे.)

 

Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune

 

Popular posts from this blog

साठे खत (Agreement For Sale) आणि खरेदी खत (Sale Deed) यातील फरक

सारांश :  विक्री व कराराच्या करारामध्ये त्याच बाबींचा समावेश असला तरी एखाद्या विवाद निर्माण झाल्यास एकावर काही बाबी अंमलात आणण्याचा व दुस - यावर त्याच बाबींच्या मर्यादा येतात हे या लेखाचे विश्लेषण आहे . विक्रीचा अर्थ समजणे : विक्री किंमत किंवा शुल्कासाठी मालमत्तेची मालकी हस्तांतरण म्हणून समजली जाते . हे मालमत्तेतील सर्व अधिकारांचे पूर्ण आणि संपूर्ण हस्तांतरण दर्शविते आणि विक्रेता हस्तांतरित मालमत्तेत कोणतेही हक्क राखत नाही . विक्रीची संकल्पना उपकरणांद्वारे प्रभावी केली जाते , ज्यास करार आणि विक्री करारास करार म्हणतात . याव्यतिरिक्त , गिफ्ट डीड , विल्स इत्यादीद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे इतर मार्ग आहेत परंतु अशा व्यवहारांमध्ये विचारात घेतलेले नाही , जे कराराच्या विक्री आणि कराराच्या कराराचा मुख्य घटक आहे . विक्रीच्या कराराचा अर्थ : मालमत्ता विक्री आणि खरेदीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये आम्ही विक्रीसंदर्भातील करारासह व्यवहार सुरू करतो ज्यास विक्रीचे स्मारक (a Memorandum for Sale) देखील म्हटले जाऊ शकते . हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये पक्षांदरम्यान ठरलेल्या अटी व शर्तींचा समावेश आह

Live-in Relationship Agreement Format In India

लिव्ह - इन रिलेशनशिप म्हणजे काय ? भारतीय तरुण पिढी आत्याधुनिक होत आहे आणि स्वच्छदीपणे जगणे त्यांना आवडते आणि त्यांनी अर्वाचिन (Modern) चालीरितींचा स्विकार करत आहेत . लिव्ह - इन रिलेशन हा या अर्वाचिन (Modern) संस्कृतीचा एक भाग आहे . live-in relationship agreement लिव्ह - इन रिलेशनशिपची भारतीय कायद्यात व्याख्या नाही . पण लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये अविवाहीत दोन व्यक्ती या एकमेकांच्या समंतीने विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्रित राहतात . या प्रकारचे संबंध काही देशांमध्ये अतिशय सामान्य आहेत पण भारतात नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपमधील संबंध काहीवेळा दीर्घकाळ टिकूण राहून त्याचे रुपांतर हे नात्यात होते किंवा फारकाळ टिकत नाहीत . लिव्ह - इन रिलेशनशिपसाठी कायदेशीर अटी खालीलप्रमाणे :- १ . दोन्हीही व्यक्ती या जोडप्याप्रमाणे एकत्र राहले पाहीजेत . 2. दोघेही अज्ञानी असता काम नयेत म्हणजे त्यांचे वय लग्नासाठी कायद्यानी उचित असले पाहीजे . 3. दोन्हीही व्यक्ती या अविवहीत असल्या पाहीजेत . जोडप्यामधिल एखादी व्यक्ती ही घटस्फोटीत किंवा विधवा / विधुर असू शकते . ४ . दोन्हीही व्यक्ती या स्वःइच्छेने एकत्रित राहतात

Legal Heir Certificate And Succession Certificate

कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्रक्रिया व कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate ) यांच्यामधील फरक   1. बॉम्बे रेगुलेशन अ‍ॅक्टनुसार जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा पुढील कायदेशीर वारस कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात . 2. हे प्रमाणपत्र सामान्यत : निधन झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांसाठी आवश्यक असते आणि निवृत्तीवेतन दावे , भविष्य निर्वाह निधीचे दावे , विमा दावे , ग्रॅच्युइटी , सेवानिवृत्तीचे फायदे , सेवेचे फायदे इत्यादींसाठी कायदेशीर वारस वापरू शकतात . 3. मालमत्ता हस्तांतरणाच्या बाबतीत कायदेशीर वारस प्रमाणपत्र वापरले जाऊ शकत नाही ज्यात एखाद्या व्यक्तीची वैध इच्छेविना मृत्यू होतो आणि पैशाच्या आस्थापनांशी संबंधित प्रकरणांमध्ये . या प्रकरणांमध्ये , आम्हाला वारसा प्रमाणपत्र (Succession Certificate ) आवश्यक आहे . आम्ही मुख्यतः वारस व्यक्तीसाठी मृत व्यक्तीने मागे ठेवलेल्या मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी सक्सेन प्रमाणपत्र वापरतो . कायदेशीर वारस प्रमाणपत्र ( legal heir certificate) मिळण्याची प्