Skip to main content

Posts

For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments

For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments   केंद्र व महाराष्ट्र सरकारने केलेली दुरुस्ती - मुलींचे मिळकतीमधील हक्क वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट , १९३७ च्या पूर्वी स्त्रीला व मुलींना वाटपात हक्क नव्हता किंवा हिंदू एकत्र कुटुंबाची जी मिळकत आहे त्यात त्यांना हक्क नव्हता . १९३७ साली दि . वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट हा कायदा आला व त्यामध्ये जर वाटप झाले तर विधवा स्त्रीला हक्क प्राप्त झाला . त्यानंतर दि .17/06/1956 रोजीच्या हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे प्रथमच आई , मुलगी यांना वाटपात हक्क दिले गेले तसेच विधवेस मुलाइतका हक्क नवऱ्याच्या मिळकतीत प्राप्त होतो व मुलीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतित जो काही वडिलांचा हिस्सा निघेल त्या हिश्शामध्ये वारसाप्रमाणे वाटप करुन जो काही हिस्सा येतो तो काढता येतो व तो तिला प्राप्त होतो . दि . 22/06/1994 रोजी हिंदू वारसा ( महाराष्ट्र दुरुस्ती ) कायद्याप्रमाणे मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकेच हक्क प्राप्त झाले आहेत व दि . 22/06/1994 रोजी नंतर ज्यांची लग्ने झाले

Property Distribution Individuals Who Receive A Share

Property Distribution Individuals Who Receive A Share  Property Distribution Individuals Who Receive A Share  वाटपामध्ये ज्यांना हिस्सा प्राप्त होतो त्या व्यक्ती - सर्वसाधारण प्रत्येक सहदायिक जो सहहिस्सेदार आहे त्याला वाटप मागण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक सहहिस्सेदाराला वाटपामध्ये त्याचा हिस्सा मिळतो . पूर्वी स्त्रियांना वाटप मागण्याचा हक्क नव्हता परंतु १९५६ नंतर विधवेस एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील हिस्सा मागता येतो . अलिकडे महाराष्ट्र सरकारने मुलींना मुलाइतकाच हक्क सहदायिक म्हणून 1994 साली दिलेला आहे . २२ जून 1994 नंतर ज्यांची लग्ने झालेली आहेत त्यांना अगर एकत्र कुटुंबातील कुमारिकांना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करुन मागण्याचा हक्क आहे . हिंदू सक्सेशन ॲक्ट (Hindu Succession Act) कलम 6 प्रमाणे विधवा , मुली , आई , मयत मुलाची मुलगी वगैरेंना हक्क दिलेले आहेत . तेव्हा त्यांनाही वाटपात हिस्सा मिळतो . तसेच एकत्र कुटुंबातील ज्यांनी मिळकत खरेदी केली आहे त्यांसही वाटप करुन मागता येते . पात्रता नसलेल्या सहहिस्सेदारास वाटप करुन मागता येत नाही आणि बाम्बे स्कूलप्रमाणे वडील जर आजोबांसहित राहत अ