For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments For Property Rights to Girls, Govt. Makes Landmark Amendments केंद्र व महाराष्ट्र सरकारने केलेली दुरुस्ती - मुलींचे मिळकतीमधील हक्क वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट , १९३७ च्या पूर्वी स्त्रीला व मुलींना वाटपात हक्क नव्हता किंवा हिंदू एकत्र कुटुंबाची जी मिळकत आहे त्यात त्यांना हक्क नव्हता . १९३७ साली दि . वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी ॲक्ट हा कायदा आला व त्यामध्ये जर वाटप झाले तर विधवा स्त्रीला हक्क प्राप्त झाला . त्यानंतर दि .17/06/1956 रोजीच्या हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे प्रथमच आई , मुलगी यांना वाटपात हक्क दिले गेले तसेच विधवेस मुलाइतका हक्क नवऱ्याच्या मिळकतीत प्राप्त होतो व मुलीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतित जो काही वडिलांचा हिस्सा निघेल त्या हिश्शामध्ये वारसाप्रमाणे वाटप करुन जो काही हिस्सा येतो तो काढता येतो व तो तिला प्राप्त होतो . दि . 22/06/1994 रोजी हिंदू वारसा ( महाराष्ट्र दुरुस्ती ) कायद्याप्रमाणे मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकेच हक्क प्राप्त झाले आहेत व दि . 22/06/1994 रोजी नंतर ज्यांची लग्ने ...
We Make Law Easy For Everyone