धनादेश बाऊन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे सुप्रीम कोर्टाने धनादेश बाऊन्स प्रकरणांची सुनावणी वेगवान करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केलेली आहेत . Speedy Disposal of Cheque Bounce Cases 7 मार्च , २०२० रोजी CJI Bobde and Justice L Nageswara Rao यांच्या खंडपीठाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट या कायद्यातील कलम १ 38 अन्वये त्वरित खटल्याच्या पद्धती तयार करण्यासाठी सु - मोटो खटला दाखल केलेला होता . सुप्रीम कोर्टाने भारतातील 35 लाखाहून अधिक चेक बाऊन्स प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी विशिष्ट उपाय - योजना सुचविण्यासाठी पॅनेल गठित केले होते . मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आर . सी . चौहान यांच्या अध्यक्षतेखाली हे पॅनेल गठित करण्यात आले होते . पॅनेलला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते ज्यामुळे the subordinate courts च्या अडचणी वाढत आहेत . न्यायालयीन यंत्रणेतील चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये जवळपास 30 टक्के प्रकरणांची वाढ झाली असून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट या कायद्यातील कलम १ 38 अन्वये चेक बाऊन्स केल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर कोर्टाने कोण...
We Make Law Easy For Everyone